आपला जिल्हाराजकीयसामाजिक

जनविकास बांधकाम कामगार व इतर कामगार संघटना बीड यांच्या वतीने केज नगरपंचायत येथे मजुरांना सुरक्षा कीट व ई-श्रम कार्ड वाटप संपन्न .

केज प्रतिनिधी

केज येथे दि. ७ रोजी जनविकास बांधकाम कामगार व इतर कामगार संघटना यांच्या वतीने बांधकाम मजुरांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संच तसेच ही श्रम कार्ड व बांधकाम मजूर कार्ड यांच्या वाटपाचा केज नगरपंचायत या ठिकाणी भव्य मेळावा ७ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला.बांधकाम मजुरांना कामावर गेल्यावर कोणत्याही प्रकारची हाणी होऊ नये, त्यांची सुरक्षा व्हावी,यासाठी महाराष्ट्र शासन विविध योजना राबविण्यात येत आहेत. बांधकाम मजूर यांना मध्यांन भोजन, सुरक्षा संच, ई-श्रम कार्ड, यांच्या माध्यमातून त्यांचा पाल्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन निधी, लग्नासाठी साहित्य, अशा वेगवेगळ्या प्रकारचे बांधकाम मजुरांना निधी दिला जातो. आज केज नगरपंचायत येथे जनविकास बांधकाम कामगार व इतर कामगार संघटना बीड यांच्या वतीने केज शहर व ग्रामीण भागातील मजुरांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संच वाटप तसेच ई-श्रम कार्ड वाटप करण्यात आले. तसेच गणेशोत्सव निमित्त उत्कृष्ट देखावा स्पर्धा ठेवण्यात आले होत्या त्या मधील प्रथम, द्वितीय, व तृतीय,गणेश मंडळांना केज नगरपंचायत यांच्या वतीने पाच हजार, तीन हजार, दोन हजार व एक हजार अशा स्वरूपाचे बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच जावेद शेख सर यांना पी एच डी प्रदान झाल्याबद्दल, डॉ प्रभाकर ठोके यांनी एल एल बी झाल्याबद्दल व अनिल वैरागे यांना लोकरत्न कला पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हरुण भाई इनामदार मेळाव्याला उद्घाटक म्हणून केज नगरपंचायत च्या नगराध्यक्ष सिताताई बनसोड तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अंकुशराव इंगळे, हे उपस्थित होते तसेच प्रमुख उपस्थिती दिलीपराव गुळभिले, जलाल भाई इनामदार, भाऊसाहेब गुंड बाळासाहेब गाढवे,पद्मिनी ताई शिंदे,अशोकराव सोनवणे,रंजीत घाडगे, मस्साजोगचे सरपंच कानडीबदन चे सरपंच धोत्रा गावचे सरपंच,मिरगणे आप्पा व इतर मान्यवर व केज नगरपंचायत चे सर्व कर्मचारी व मोठ्या संख्येने बांधकाम मजूर उपस्थित होते…

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.