आपला जिल्हा

सरस्वती कन्या प्रशालेची विद्यार्थ्यांनी कु.गार्गी गवळी हिची एन.एम.एम.एस. परीक्षेच्या गुणवत्ता यादीत निवड

कु.गार्गी गवळीच्या निवडीने मुख्याध्यापक, शिक्षकवृंदाचे कौतुक

केज/प्रतिनिधी

केज येथील माऊली विद्यापीठ अंतर्गत सरस्वती कन्या प्रशालीची विद्यार्थिनी कु. गार्गी तात्या गवळी हिची एन.एम.एम.एस. परीक्षेच्या गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. या निवडीबद्दल कु.गार्गी गवळी सह सरस्वती कन्या प्रशालेच्या सर्व मार्गदर्शक शिक्षक वृंद यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
२०२५-२६ ची एन.एम.एम.एस. परीक्षा ही दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आली होती या परीक्षेचा निकाल हा दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी लागला असून दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे. या निवड यादीमध्ये सरस्वती कन्या प्रशालेची विद्यार्थिनी कु. गार्गी तात्या गवळी या विद्यार्थिनीची निवड झालेली असुन सरस्वती कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती डोंगरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व मार्गदर्शक शिक्षक वृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन कु. गार्गी गवळी या विद्यार्थिनीला लाभल्यामुळे कु.गार्गीला या यशापर्यंत पोहचता आले.असे मत तिचे पालक पत्रकार आयु. तात्या गवळी व्यक्त केले
या यशाबद्दल गार्गी गवळी व तिचे आई-वडील आणि सरस्वती कन्या प्रशालेचे शिक्षक वृंद यांचे आभार मानून त्यांचे अभिनंदन केले आहे.तर कु.गार्गी गवळी हिचे सर्व स्तरातून कौतुक होत असून तिच्या या यशाबद्दल कु.गार्गी गवळीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.