आजची पिढी अभ्यासू म्हणून गुणवंतांची संख्या वाढतेय – रमेशराव आडसकर
संत तुकाराम पब्लिक स्कुलचा वर्धापन दिन ; समर कॅम्पला प्रारंभ

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील श्री साई समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, संत तुकाराम पब्लिक स्कुलचा प्रथम वर्धापन दिन मंगळवारी झाला. यावेळी समर कॅम्पच्या निमित्ताने उपस्थित विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधताना अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर म्हणाले की, आजची पिढी अभ्यासू, हुशार आहे म्हणून गुणवंतांची संख्या वाढतेय. ठोंबरे परिवार हा मेहनती, कष्टाळू आणि प्रामाणिक आहे. व्यवसाय कोणताही असो त्यात मन लावून काम केले तर हमखास यश मिळते. उत्तमराव ठोंबरे गुरूजी हे कै.आडसकर तात्यांचे निष्ठावंत सहकारी आहेत. त्यांच्या दूरदृष्टीतून व
संस्थाचालक संग्राम दिलीपराव मोहिते आणि आकाश किसनराव अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली श्री साई समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण क्षेत्रात अतिशय उत्तम काम करीत आहे असे चेअरमन आडसकर यांनी सांगितले.
जुन्या आरटीओ ऑफिस शेजारी, यशवंतराव चव्हाण चौक, नवीन मोरेवाडी, अंबाजोगाई येथे श्री साई समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, संत तुकाराम पब्लिक स्कुलचा प्रथम वर्धापन दिन प्रसंगी समर कॅम्पचा प्रारंभ मंगळवार, दि. ५ मे रोजी करण्यात आला. या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून रमेशराव आडसकर (चेअरमन, अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना, लि.अंबासाखर) तर अध्यक्षस्थानी शिक्षणतज्ज्ञ ईश्वर मुंडे (अध्यक्ष, ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, गांजपुर.) आणि प्रमुख अतिथी म्हणून अमरराव देशमुख (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, अंबाजोगाई.), रमेशराव लोमटे (प्रसिद्ध कंत्राटदार), उत्तमराव ठोंबरे गुरूजी (उंदरी) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कृषी, शिक्षण, संशोधन व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे, कुशल मनुष्यबळ विकास, शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ.नागेश जोंधळे, उद्योग क्षेत्रात मागील ३५ वर्षांपासून दैदिप्यमान कामगिरी करणारे प्रसिद्ध उद्योजक दिनेश वाघमारे, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्राचार्य स्वप्नील कडेकर, वयाची ७५ पुर्ण करून ही शिक्षण क्षेत्रात एक मार्गदर्शक म्हणून उल्लेखनीय कार्य करणारे उत्तमराव ठोंबरे गुरूजी (उंदरी) आणि शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रबोधनाचे कार्य करणारे रामकिसन मस्के यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. यावेळी दिनेश वाघमारे, प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे, रामकिसन मस्के यांनी मानले विचार व्यक्त करून सत्काराला उत्तर दिले. तर अध्यक्षीय समारोप करताना शिक्षणतज्ज्ञ ईश्वर मुंडे म्हणाले की, आज समाजाला आग विझवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची गरज आहे. संस्थाचालक संग्राम दिलीपराव मोहिते व आकाश किसनराव अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंदराव ठोंबरे हे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. आजची मुलं ही जन्मजात हुशार आहेत. तरी देखील आजच्या स्वैर होत चाललेल्या पिढीवर गुरूजन आणि वडीलधाऱ्या लोकांचा धाक, अंकुश हवा आहे. ज्ञानाबरोबरच संस्कार देणारे संत तुकाराम पब्लिक स्कूल ही शाळा असल्याचे गौरवोद्गार शिक्षणतज्ज्ञ मुंडे यांनी काढले. सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यांनंतर शौर्या राहुल पोटभरे, अनन्या राजू मोरे, जानव्ही दत्तात्रय जगताप व श्रद्धा नवनाथ कांबळे या विद्यार्थीनींनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका नगमा शेख यांनी केले. तर बहारदार सुत्रसंचालन अंगद गायकवाड यांनी केले आणि उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक श्रीमती रेश्मा नखाते यांनी मानले. यावेळी सभागृहात मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ जाधव, संभाजी ब्रिगेडचे विभागीय सचिव प्रवीण ठोंबरे, सुदामराव ठोंबरे पाटील, धर्मराज सोळंके, पत्रकार रणजित डांगे, प्रा.अरूण गंगणे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनुरथ काशीद, मुजीब काझी, ऍड.प्रशांत शिंदे, अनिल माचवे, नारायण मुळे, बाळासाहेब देशमुख, ऍड.दयानंद लोंढाळ, लहूजी शिंदे, प्रमोद गवळे, हसनभाई शेख, बालाजी मुळे, सचिन साखरे, ओमकार डिकले, ज्ञानेश्वर मोरे, सुनंदाताई लोखंडे, संभाजी वाळवटे, संभाजी घोरपडे, दत्ता देवकते, पुरूषोत्तम देशमुख, विकास लोंढाळ, चंद्रकांत सोळंके, चंद्रकांत वडमारे, शिनगारे, अक्षय सिरसाट, तुकाराम कदम, कपिल टेहरे, पृथ्वीराज सोनवणे, सतिश कुंडगर, धनराज पौळ, गणेश कोल्हे, उजगरे, बनसोडे, कांबळे, पोटभरे, सुंदर शेळके, नूर शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
मुख्याध्यापक रेश्मा नखाते, सरोजा उबाळे, नगमा शेख, प्रतिभा धिमधिमे, वनमाला दळवी, कांताबाई सोळंके, आश्विनी थोरात, श्रध्दा स्वामी तसेच शिपाई अनुराधा कांबळे व प्रविण राऊत, ओमकार पौळ, केशव टेहरे, इंद्रजित पवार, सम्राट अंबाड, ऋषिकेश कडबाने यांच्यासह अनेकांनी पुढाकार घेतला होता. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारीवृंद आणि उंदरी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.



