आपला जिल्हा

केकतसारणी येथे राष्ट्रचिंतन अभियान उत्साहात संपन्न ; कृषी, आरोग्य आणि शिक्षण विषयावर सखोल मार्गदर्शन

केकतसारणी येथे राष्ट्रचिंतन अभियान उत्साहात संपन्न ; कृषी, आरोग्य आणि शिक्षण विषयावर सखोल मार्गदर्शन

 

केज/प्रतिनिधी

 

हिंदराष्ट्र ऑर्गनायझेशन संस्थेच्या वतीने राष्ट्रचिंतन अभियान अंतर्गत केकतसारणी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याकार्यक्रमात कृषी, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली असून, यामाध्यमातून ग्रामस्थांना नवी प्रेरणा मिळाल्याची माहिती हिंदराष्ट्र संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ.राधाताई सपकाळ यांनी दिली.या कार्यक्रमा साठी मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉ.अशोक थोरात यांनी भूषविले.कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून महर्षी गज अरविंदजी उपस्थित होते.त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित जनसमुदाय प्रभावित झाला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खालील मान्यवर उपस्थित होते.

दादासाहेब ससाने शिवसेना विधानसभा प्रमुख,पृथ्वीराज (अण्णासाहेब) पाटील शिवसेना तालुकाप्रमुख,

नसरीन बागवान राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षा,जीवन थोरात,रामदास सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.कृषी,आरोग्य, शिक्षण या तीन प्रमुख विषयांवर मंथन करण्यात आले. कार्यक्रमाचा मुख्य केंद्रबिंदू कृषी,आरोग्य आणि शिक्षण हे तीन विषय होते.चर्चासत्राच्या माध्यमातून उपस्थित नागरिकांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.ग्रामीण भागातील विकासासाठी हे तिन्ही घटक अत्यंत महत्त्वाचे असून,त्यावर तज्ञांनी केलेले मार्गदर्शन भविष्यात दिशादर्शक ठरेल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.या कार्यक्रमाच्यामाध्यमातून अनेक लोकांचे प्रश्न सुटले असून त्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे.कृषी, शिक्षण आणि आरोग्य या विषयांवरील सखोल मार्गदर्शनाचा लाभ सर्वांना झाला आहे असे

सौ.राधाताई सपकाळ प्रदेश उपाध्यक्षा,हिंदराष्ट्र संघ यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

 

लोकसहभाग आणि आभार

 

केकतसारणी गावासह आजूबाजूच्या गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल आणि गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सौ. राधाताई सपकाळ यांनी सर्व ग्रामस्थांचे व परिसरातील नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.आभार प्रदर्शनाने कार्यक्रमांची सांगता झाली.

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.