ढेकनमोह येथे क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात समारोप
डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते बक्षीस वितरण

बीड ( प्रतिनिधी) बीड तालुक्यातील ढेकनमोहा येथे डॉ. सारिका योगेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट बॉल स्पर्धेचा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेतील विजेत्या संघांना भाजप नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते ट्रॉफी व रोख बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
या स्पर्धेत नाळवंडी सर्कलसह परिसरातील ग्रामीण भागातील अनेक संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. स्पर्धा अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडली. अंतिम फेरीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत ढेकनमोह संघाने प्रथम क्रमांक पटकावला. तर जरूड संघाने द्वितीय, अंतरवन पिंपरी संघाने तृतीय आणि मौजवाडी संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस म्हणून ५१ हजार रुपये भाऊ नाना सुरवसे यांच्या वतीने देण्यात आले. द्वितीय बक्षीस ३१ हजार रुपये भगीरथ आबा बांडे यांनी, तृतीय बक्षीस २१ हजार रुपये अच्युत शेळके यांनी, तर चतुर्थ बक्षीस ११ हजार रुपये चंद्रकांत फड यांनी दिले.
बक्षीस वितरण सोहळ्यावेळी डॉ. योगेश क्षीरसागर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करत ग्रामीण भागातील युवकांनी खेळाकडे अधिक लक्ष देण्याचे आवाहन केले. तसेच अशा स्पर्धांमुळे गावोगावी क्रीडा संस्कृतीला चालना मिळते, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला उद्धव मेहेत्रे, भाऊ सुरवसे, भगीरथ बांडे, अच्युत शेळके, शांतिनाथ डोरले, चंद्रकांत फड, मा. सरपंच नागेश शिंदे, मिलिंद ठोकळ, रमेश वाघमारे, प्रा. नवनाथ मुसळे, वसंत गुंदेकर, राहुल कोरडे, डॉ. किशोर वरपे, शामराव राऊत, हरीष खाडे, अशोक वैद्य, प्रा. सुतार सर, पत्रकार अमोल जाधव, भागवत खाकरे, हनुमंत बाडे, अनंत करांडे, आण्णासाहेब डोके, अविनाश गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.



