आपला जिल्हावैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिक

शिवा संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी दिपक लामतुरे यांची नियुक्ती

वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने स्वागत

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

येथील युवक कार्यकर्ते दिपक सुनिल लामतुरे यांची शिवा – अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. लामतुरे यांच्या निवडीचे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे.

 

टायगर ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी सामाजिक कार्यात सहभागी असलेले अंबाजोगाई येथील युवक कार्यकर्ते दिपक सुनिल लामतुरे यांची शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांनी नियुक्तीपत्र देवून बीड जिल्हाध्यक्षपदी नुकतीच बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर रोजी नियुक्ती केली आहे. यावेळी दिपक लामतुरे यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे की, शिवा‌ – अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी या पदावर आपली नियुक्ती करण्यात आली आहे. तेव्हा आपण बीड जिल्हयातील तालुका, सर्कल व गावा-गावात जावून वीरशैव लिंगायत समाज बांधवांना संघटीत करण्याचे पवित्र कार्य करून शिवा संघटना वाढविण्यासाठी व मजबूत करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत. तसेच शिवा संघटनेच्या माध्यमातून होणाऱ्या वीरशैव लिंगायत समाजाच्या या अति महत्वाच्या व उदात्त कार्यासाठी आपणांसह सर्व पदाधिकाऱ्यांना व संपुर्ण कार्यकारणीस माझ्या हार्दिक शुभेच्छा असल्याचे शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांनी नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. दिपक लामतुरे यांची शिवा – अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देताना त्यांच्यासोबत टायगर ग्रुपचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष उमेश भाऊ पोखरकर, तिरूपती राठोड, बालाजी रूद्राक्ष, कोंडीराम पवार, करण जोगदंड, गौरव गोदगे, कृष्णा नरसिंगे, शंभू देशमुख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. दिपक लामतुरे यांच्या निवडीचे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे.

 

 

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.