आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

आनंदगाव येथे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान

सामाजिक उपक्रम

वैभवशाली महाराष्ट्र न्युज

केज दि १०( प्रतिनिधी) तालुक्यातीनंदगाव आदर्श सरपंच, पाटोदा गावचे शिल्पकार भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान आज दि (११) गुरुवार रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आले आहे. ग्राम सुधारण्याचा मूलमंत्र घेण्यासाठी नागरिकांनी या व्याख्यानास उपस्थित राहावे असे आवाहन आनंदगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे
आनंदगाव नेहमीच चळवळीच्या रूपाने विविध उपक्रमाच्या माध्यमातून अग्रेसर राहिलेले आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव चे निमित्त ठेवून युवकांमध्ये जनजागृती व्हावी आदर्श गाव निर्मिती साठी मार्गदर्शन मिळावे म्हणून पेरे पाटील यांचे व्याख्यान ठेवण्यात आले आहे परिसरातील सरपंच उपसरपंच नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.