आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणवैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिक

ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचा राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार युवराज हिरवे यांना जाहीर

शैक्षणिक विशेष न्युज नेटवर्क

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

 

केज/प्रतिनिधी

 

केज तालुक्यातील कळमआंबा येथील भूमिपुत्र,मानेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे प्र.मुख्याध्यापक युवराज अभिमन्यू हिरवे यांच्या शैक्षणिक उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्य,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कायम धडपड,विविध शैक्षणिक उपक्रमातील नाविन्यता,सामाजिक उपक्रमात सक्रिय योगदान शाळा परिसर व गाव परिसर ५०० च्या वर झाडे लावुन संगोपन केले.लोक सहभागातुन विद्यार्थ्यांना लॅपटॉप

संगणक दिले.शाळा परिसर तंबाखूमुक्त केला व तालुक्यातील शाळा परिसर तंबाखुमुक्त करण्यासाठी तालुका समन्वयक म्हणुन कार्य केले.आडस केंद्र तंबाखु मुक्त केले.बालविवाह रोखण्यासाठी केंद्र समन्वयक म्हणुन कार्य केले.पाणी फाऊडेशन वॉटरकप स्पर्धा हिरीरीने सहभाग,गावाला व्दितीय क्रमांकाचे बक्षीस मिळवुन दिले.कोरोना कालावधीमध्ये वेगवगेळ्या सेवाभावी संस्थेच्या माध्यामातुन गरजू व्यक्तीना अन्नधान्य किट चे वाटप केले. अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता मोहीम विविध स्पर्धा यांचे आयोजन, अक्षर परिवार समूहकार्य,

महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी व्याख्याने, कविसंमेलन,पोवाडे, साजरे करून सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी पुढाकार घेतला.अशा कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार ग.दि.माडगूळकर नाट्यगृह निगडी पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.यापूर्वी त्यांना जलरत्न पुरस्कार,आदर्श शिक्षक पुरस्कार,कोरोना योद्धा पुरस्कार यासह विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.