आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणसामाजिक

विद्याभवन हायस्कूल कळंब येथे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप

सामाजिक व शैक्षणिक उपक्रम

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

(कळंब प्रतिनिधी)

ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित विद्याभवन हायस्कूल कळंब येथे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दीडशे स्कूल किटचे वाटप करण्यात आले. सदरील स्कूल किट मध्ये नऊ रजिस्टर, कंपास पेटी, रंगपेटी, चित्रकला वही, आलेख वही, स्कूल बॅग, आदी शैक्षणिक साहित्यांचा समावेश आहे. सदरील शैक्षणिक साहित्य सेवा सहयोग फाउंडेशन पुणे व ग्रामशक्ती फाउंडेशन अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने वाटप करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्याभवन हायस्कूलचे मुख्याध्यापक व्यंकट कुंभार, प्रमुख अतिथी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सहसचिव भागवतराव गव्हाणे, उपमुख्याध्यापक मयाचारी व्ही एस, पर्यवेक्षक कोळी जे.एन, ग्रामशक्ती फाउंडेशन चे अध्यक्ष तथा सेवा सहयोग फाउंडेशन पुणे चे शिक्षा समन्वयक ज्योतीराम सोनके, ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन चे उपाध्यक्ष दत्तात्रय पवार यांची व्यासपीठावरती उपस्थित होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीडशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट वाटप करण्यात आले. प्रमुख अतिथी भागवतराव गव्हाणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की ग्रामीण भागातील, एकल पालक, गरीब व गरजू, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी संस्थेचे कार्य अतुलनीय आहे. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना यावेळी स्कूल किटचे वाटप करण्यात आले यावेळी ज्योतीराम सोनके यांनीही संस्थेच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. संस्था बारावीनंतर गुणवंत व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देते. यावेळी सुशील तीर्थकर, सुनील बारकुल, सतीश कानगुडे, सोपान पवार, विशाल पवार, रविकांत कोल्हे, सागर विनोद , संदीप पाटील, शरद टोंपे, आप्पासाहेब वाघमोडे, आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.