लातूर पॅटर्न प्रमाणेच केज पॅटर्न नावारूपास येतोय – पत्रकार प्रा.सिरसट दादा
शैक्षणिक विशेष

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
*केज/ प्रतिनिधी –*
केज येथील आवाड एज्युकेशनल अकॅडमी मध्ये पार पडलेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात अध्यक्षीय भाषणात पत्रकार सिरसट दादा बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पत्रकार प्रा.सिरसट दादा तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.हनुमंत सौदागर सर उपस्थित होते.पुढे बोलताना सिरसट दादा म्हणाले की,केज तालुक्यामध्ये लातुर प्रमाणेच शैक्षणिक वातावरण तयार करण्यात प्रा.आवाड सरांच्या प्रयत्नांना यश येत असुन त्याचा सकारात्मक परिणाम प्रतिवर्षी लागणाऱ्या निकालातून दिसून येत आहे.म्हणूनच शिक्षणातील लातूर पॅटर्न प्रमाणेच केज पॅटर्न तयार होत आहे.दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शाहु कॉलेजच्या स्क्रिनिंग टेस्ट परीक्षेत,आवाड एज्युकेशनल अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
लातूर येथील राजर्षी शाहु कॉलेजची स्क्रिनिंग ची परीक्षा म्हणजे महाराष्ट्रातील 11वी च्या प्रवेशासाठीची सर्वात मोठी परीक्षा असते,कारण या परीक्षेला पंधरा-वीस हजार परीक्षार्थी 120 जागांसाठी चुरशीने अभ्यास करतात.मिनी NEET समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत दरवर्षी आवाड एज्युकेशनल अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात निवडले जातात.यावर्षी देखील या परीक्षेत केज येथील AEA च्या १३ विद्यार्थ्यांनी पहिल्याच यादीतून प्रवेश मिळवला.(शाहू कॉलेज 08 जण व संत तुकाराम कॉलेजला 05 जण) निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे.
शाहू महाविद्यालय लातूर :
1.अकांक्षा सांजुरे,2.श्रावण चाटे,3.अपेक्षा आढाव,4. विराट बांगर,5.श्रेयश बनसोडे,6.प्रज्ञा घुले,7.आदित्य मुळे,8.हिंदवी यादव
संत तुकाराम महाविद्यालय :
1.ज्ञानदा गायकवाड,2.सई साखरे,3.सलोणी रीनवा,4.आयुष सातपुते,5.अद्वैता राऊत
या विद्यार्थ्यांची निवड झाली.
यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अकॅडमीच्या फाऊंडेशन व सराव परिक्षेचा खूप फायदा झाल्याचे सांगितले.
याप्रसंगी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक करताना डॉ.विठ्ठल आवाड सरांनी हे यश केज शहरामधील शैक्षणिक वातावरणामुळे व AEA च्या टिमवर्कमुळे मिळाल्याचे सांगितले. प्रमुख पाहुणे प्रा.सौदागर सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.व पुढील स्पर्धात्मक युगात जिद्दीने अभ्यास करून सर्वोच्च यशाला गवसणी घालण्याचे आवाहन केले.याप्रसंगी प्रा.जाधव सर व प्रा.डांगे सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सीमा मॅडम यांनी केले तर आभार डॉ.प्रा.विठ्ठल आवाड सर यांनी मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.



