गोरक्षनाथ प्राथमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
शैक्षणिक विशेष 2026

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज चॅनलची
ढेकणमोहा (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील ढेकणमोहा येथील गोरक्षनाथ प्राथमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव सोमनाथराव बडे सर रामा भोगे संचालक खरेदी विक्री संघ बीड माजी सरपंच नागेश शिंदे, बंडु गाडीवान सरपंच ढेकणमोहा पोलीस कॉन्स्टेबल घुमरे साहेब, तावरे साहेब, गोवर्धन दराडे, संतोष जाधव , दिनेश पिसाळ सुरेश देवकते प्रमुख पाहुणे उपस्थित होते यावेळी लहान चिमुकल्यांनी लोकगीत, भक्ती गीत, कोळीगीत ,विनोदी नाटिका, मराठमोळी लावणी अशा विविध नृत्यप्रकार सादर केले तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या नाटिकांचेही सादरीकरण करण्यात आले.विद्यार्थ्यांनी सादर केलेली गाणी, समूह नृत्य आणि नाटकांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
विद्यार्थ्यांचा सहभाग लहान मुलांपासून ते मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी उत्साहाने कार्यक्रम पाहण्याचा आनंद घेतला
पालकांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले आणि विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळाल्याचे समाधान व्यक्त केले.
हा स्नेहसंमेलन कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा आणि त्यांच्यामध्ये एकजुटीची भावना निर्माण करणारा ठरला. या वार्षिक सोहळ्याने सर्वांनाच आनंदित विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुंडे सर (मुख्याध्यापक) मनोज बडे सर , बळीराम जाधव सर, (प्राथ मुख्याध्यापक) अमोल गीते सर, प्रकाश शिंदे सर, राऊत सर, तावरे सर, खराडे सर, डोंगरे सर, सुतार सर, गीते सर, मुसळे सर, घोरड सर, चौरे सर, वाघमारे सर, कांबळे सर , एम आर मुंडे सर ,भुरके सर ,काळे सर पवार सर ,थापडे सर, तीरणकर सर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश शिंदे सर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



