समर्पित शिक्षक यांच्या कार्याचा गौरव – श्री. बिभीषण मोहिते यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात साजरा
खासदार श्री बजरंग बप्पा सोनवणे यांच्या विशेष उपस्थितीत सत्कार समारंभ संपन्न

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
केज ता.प्रतिनिधी
सुकळी ता. केज येथील निसर्गराजा मंगल कार्यालयात जि.प. प्रा. शा. गोटेगाव येथील सहशिक्षक श्री. बिभीषण मारुतीराव मोहिते यांच्या सेवापूर्ती निमित्त भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
ग्रामीण शिक्षणाच्या उन्नतीसाठी दिलेल्या त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांना शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी बद्दल “आदर्श शिक्षक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले असून यावेळी कार्यक्रमाप्रसंगी
मनोगत व्यक्त करताना खासदार बजरंग सोनवणे म्हणाले कि
“श्री. मोहिते सर यांचे कार्य हे केवळ शिक्षक म्हणून नव्हे, तर समाज घडवणाऱ्या मार्गदर्शकाच्या भूमिकेतून प्रेरणादायी आहे. त्यांनी घडवलेली विद्यार्थ्यांची पिढी हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे.”
कार्यक्रमास केज तालुका गट शिक्षण अधिकारी श्री केंद्र साहेब , श्री चाटे साहेब, प्राचार्य श्री गाटे सर , जेष्ठ नेते श्री बाबासाहेब बोराडे, श्री राधेश्याम ईखे, श्री मुकुंद कणसे , श्री शहाजी पवार यांच्यासह केंद्र प्रमुख श्री बोराडे सर , केंद्र प्रमुख श्री चवरे सर , केंद्र प्रमुख श्री जाधव सर तालुक्यातील अनेक जि.प शाळेतील शिक्षक वृंद, विद्यार्थी व शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी श्री. मोहिते सर यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य व आनंदी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पवार सर, श्री. आवाड सर, श्री. लाखे सर व श्री. चौधरी सर यांनी तर उपस्थितांचे आभार श्री सातपुते सर यांनी व्यक्त केले व सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.



