एमबीबीएस पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ. गीता शिनगारे यांचा पवार परिवाराकडून सत्कार
गावच्या लेकीच्या यशाचा उत्सव; सर्व स्तरातून कौतुक व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज (प्रतिनिधी) – केज तालुक्यातील मौजे आवसगाव येथील रहिवासी व केज बाजार समितीचे माजी संचालक तथा माजी सरपंच जेष्ठ नेते श्री. बन्सी आण्णा शिनगारे यांची कन्या कु. डॉ. गीता बन्सी शिनगारे हिने नुकत्याच पार पडलेल्या एमबीबीएस पदवी परीक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण होऊन डॉक्टर ही पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मौजे आवसगावचे माजी सरपंच श्री. गोविंद बप्पा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त पवार परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात सर्वप्रथम डॉ. गीता शिनगारे यांच्या आई-वडिलांचा व परिवाराचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर डॉ. गीता शिनगारे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पवार परिवारातील माता-भगिनींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. गीता शिनगारे यांनी सांगितले की, त्यांच्या या यशामागे आई-वडील, परिवार व गुरुजनांचे मोलाचे मार्गदर्शन आणि पाठबळ आहे. शिक्षणाच्या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागला, मात्र जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकले. तसेच, आज झालेल्या सत्कारामुळे भविष्यात अधिक चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले व आयोजकांचे आभार मानले. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार गोविंद नाना शिनगारे यांनी केले कार्यक्रमासआयोजक गोविंद पवार, मधुकर पवार, बाबुराव पवार, भागवत कांबळे, नवनाथ पवार, उद्धव पवार, काशिनाथ पवार, भागवत पवार, रामदास कांबळे, सुरेश पवार, शिवकुमार पवार, बळीराम साखरे, जालिंदर साखरे, दीपक शिनगारे, राघवींद्र शिनगारे यांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला



