खोलेश्वर महाविद्यालयातील एन.सी.सी.विभागाच्या १८ कॅडेट्सची भारतीय सैन्यदलात अग्निवीर म्हणून निवड

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील खोलेश्वर महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागातील १८ कॅडेट्सची भारतीय स्थल सेनेत अग्निवीर म्हणून निवड झाली आहे. यापुर्वीही महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागातील अनेक कॅडेट्सची निवड ही अग्निवीर, फायर ब्रिगेड, पोलिस खाते, वनरक्षक दल या विविध पदांवर झालेली आहे. तसेच अनेक कॅडेट्सनी कॅप्टन सुंदर खडके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरांवर उल्लेखनीय यश मिळविलेले आहे.
खोलेश्वर महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागातील ज्या १८ कॅडेट्सची भारतीय स्थल सेनेत अग्निवीर म्हणून निवड झाली त्यांची नांवे पुढीलप्रमाणे आहेत. १) निकेश गायकवाड, २) ओम धोत्रे, ३) पवन विटेकर, ४) रोहन जाधव, ५) भगवान सोळंके, ६) शुभम केंद्रे, ७) सिद्धेश्वर लाड, ८) वैभव हारे, ९) सुरज सटाले, १०) ओंकार विडेकर, ११) दिपक तिवारी, १२) ओंकार हंकारे, १३) शंकर गडदे, १४) शुभम आडे, १५) सतिश मुंडे, १६) ज्ञानेश्वर गायकवाड, १७) अभिषेक खडके आणि १८) उमेश देवकर या सर्व विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे प्रमुख कॅप्टन सुंदर खडके यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांचे मार्गदर्शक कॅप्टन सुंदर खडके यांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर, कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य, मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रा.चंद्रकांत मुळे, केंद्रीय कार्यकारणी सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राम कुलकर्णी, केंद्रीय कार्यकारणी सदस्य डॉ.कल्पनाताई चौसाळकर, स्थानिक समन्वय समितीचे डॉ.अतुल देशपांडे (अध्यक्ष, खोलेश्वर शैक्षणिक संकुल, अंबाजोगाई.), कार्यवाह किरण कोदरकर (कार्यवाह, खोलेश्वर शैक्षणिक संकुल, अंबाजोगाई.), प्राचार्य डॉ.दीपक फुलारी, उपप्राचार्य प्रा.गौतम गायकवाड, प्रा.डॉ.बिभीषण फड, डॉ.रवींद्र कुंबेफळकर, प्रा.आनंद पाठक आदींनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.



