आपला जिल्हा

टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकच्या यशाची परंपरा कायम

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

येथील श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने घेतलेल्या हिवाळी परीक्षा – २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी लक्षवेधी गुण मिळवून संस्थेच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.

 

 

टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकचे तृतीय वर्ष शाखा – संगणक अभियांत्रिकीचे विद्यार्थी क्षितीजा आत्माराम आगळे – ९७.२९ टक्के (प्रथम), वैभवी हरिकीशन रांदड – ९७.०६ टक्के (द्वितीय), समाधान अर्जुन छत्रे – ९६.५९ टक्के (तृतीय), द्वितीय वर्ष शाखा – संगणक अभियांत्रिकीचे विद्यार्थी शुभ्रा नितीन हालगे – ८९.२९ टक्के (प्रथम), योगेश्वरी गजानन गाडवे – ८९.१८ टक्के (द्वितीय), अंकिता अशोक हाके – ८८.९४ टक्के (तृतीय), प्रथम वर्ष शाखा – संगणक अभियांत्रिकीचे विद्यार्थी जान्हवी मुकुंद कराड – ८६.३५ टक्के (प्रथम), शर्वरी शिरीष हालकंचे – ८६.०० टक्के (द्वितीय), हर्षसिंग किरणसिंग रेखावल – ८५.०० टक्के (तृतीय), तृतीय वर्ष शाखा – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी पांडुरंग प्रेमराज पवार – ९१.६५ टक्के (प्रथम), वैष्णवी श्रीधर नागरगोजे – ९०.४७ टक्के (द्वितीय), अजित नरसिंग मुंडे – ८८.०० टक्के (तृतीय), द्वितीय वर्ष शाखा – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आदित्य अंगद औताडे – ८२.३५ टक्के (प्रथम), प्रसाद लहू गायकवाड – ८१.५३ टक्के (द्वितीय), गौरी संजय फुन्ने – ७९.२९ टक्के (तृतीय), प्रथम वर्ष शाखा – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी अमरजा गंगाराम कांबळे – ८२.२४ टक्के (प्रथम), अक्षता व्यंकटराव चव्हाण – ८०.३६ टक्के (द्वितीय), शुभम सुभाष मुंडे – ८०.२४ टक्के (तृतीय), तृतीय वर्ष शाखा – मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी भूमिका गोपाल परदेशी – ८१.५३ टक्के (प्रथम), आदित्य रविंद्र चव्हाण – ८१.४१ टक्के (द्वितीय), ज्ञानेश्वरी बळीराम सिरसाट-७९.२९ टक्के (तृतीय), द्वितीय वर्ष शाखा – मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी सायली संतोष वायसे – ८२.६७ टक्के (प्रथम), ओमकार अशोक रेणावरकर – ७८.७८ टक्के (द्वितीय), रितेश संभाजी घोरपडे – ७६.६७ टक्के (तृतीय), प्रथम वर्ष शाखा – मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी मंथन दत्तात्रय महामुनी – ८२.२४ टक्के (प्रथम), श्रद्धा मारूती कुकर – ७७.७७ टक्के (द्वितीय), पृथ्वीराज विक्रम मोरे – ७७.६५ टक्के (तृतीय), द्वितीय वर्ष शाखा – सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आदित्य जगन्नाथ दराडे – ८५.६५ टक्के (प्रथम), सुमित दशरथ चटप – ८१.६५ टक्के (द्वितीय), शिवप्रसाद वैजनाथ गिरवलकर – ७६.७१ टक्के (तृतीय), प्रथम वर्ष शाखा – सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी ओम मुकुंद साबणे – ९१.२९ टक्के (प्रथम), सुरज संदेश होळंबे – ८५.१८ टक्के (द्वितीय), दर्शना दिलीप चौरे – ८२.०० टक्के (तृतीय), द्वितीय वर्ष शाखा – इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी गायत्री सदाशिव मुंडे – ९०.०० टक्के (प्रथम), अंजली नरहरी घायतिडक – ८४.८२ टक्के (द्वितीय), पियुष संतोष राऊत – ८२.१२ टक्के (तृतीय), प्रथम वर्ष शाखा – इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड ण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी वैष्णवी नानाभाऊ बडे – ८२.१२ टक्के (प्रथम), चेतन सुरेश रोगी – ८१.४१ टक्के (द्वितीय), पायल विठ्ठल नाकुरे – ७७.५३ टक्के (तृतीय) क्रमांक मिळवला आहे. या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे, सचिव माधवराव पाटील (टाकळीकर), सहसचिव सुनील मिटकरी आणि सर्व सन्माननीय सदस्य तसेच कॅम्पस डायरेक्टर डॉ.बी.आय.खडकभावी, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कार्यवाह प्राचार्य एन.ए.रावबावले, पॉलिटेक्निकचे प्राचार्य एल.व्ही.बगले, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. यासंदर्भात बोलताना कॅम्पस डायरेक्टर डॉ.बी.आय.खडकभावी यांनी सांगितले की, हे पॉलिटेक्निक मागील ४२ वर्षांपासून ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार तंत्रशिक्षण देत आहे. संस्थेचे अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत असून पॉलिटेक्निकचा निकाल दरवर्षी उंचावत आहे. त्यामुळे संस्थेचे नांव महाराष्ट्रात अग्रस्थानी आहे.

 

 

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.