सध्या संगणकाचे व स्पर्धेचे युग असुन संगणक ज्ञान प्राप्त करणे अत्यंत महत्त्वाचे असुन अप्टेकने नव्याने सुरू केलेल्या अप्टेक सिस्टीम या सेवेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा – खासदार बजरंग सोनवणे
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज डिजिटल मिडिया विशेष

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
आप्टेक कॉम्प्युटर एज्युकेशन कळंब 30 वा वर्धापनदिन सोहळा व आप्टेक सिस्टीम नवीन दालन शुभारंभ उत्साहात साजरा
कळंब प्रतिनिधी

काळंब शहरात मागील अनेक वर्षांपासून यशस्वीपणे कार्यरत असलेल्या आप्टेक कॉम्प्युटर एज्युकेशनच्या 30 व्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त व आप्टेक सिस्टीम या नविन दालनाच्या शुभारंभाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार श्री बजरंग सोनवणे यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की सध्याचे युग आर्टिफिशियल इंटेलिजन्स व संगणकाचे असून प्रत्येकाने संगणकाचे ज्ञान घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक असणारा संगणक किंवा लॅपटॉप, आपल्या प्रत्येकाच्या घरात असणे आवश्यक आहे. संगणक ही आता जीवनावश्यक गरज झाल्याचे मत खा बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केले.
कळंब येथील अप्टेक सिस्टीमच्या उद्घाटन प्रसंगी व अप्टेक कॉम्प्युटर एज्युकेशनच्या तिसाव्या वर्धापन दिना च्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. .
कळंब येथे प्रसिद्ध अशा अप्टेक कॉम्प्युटर एज्युकेशन चा तिसावा वर्धापन दिन व अप्टेक सिस्टीम्स या नवीन आस्थापनेचे शुभारंभ खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी आप्पा कापसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमात एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक धनंजय जेवळीकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रा श्रीधर भवर, प्रा. बाळकृष्ण भवर, अनिल घुले यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला ॲपटेक सिस्टीम या नवीन अस्थापनेची फीत कापून व श्रीफळ वाढवून खा.बजरंग सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सर्व मान्यवरांचे स्वागत घुले परिवाराच्या वतीने अनिल घुले, संजय घुले, संकेत घुले, काशिनाथ घुले, गाजी मोमीन यांच्या हस्ते करण्यात आले.
संचालक संजय घुले यांनी प्रास्ताविक करताना ॲपटेक कॉम्प्युटर एज्युकेशनचा तीस वर्षाचा प्रवास मांडला व ॲपटेक सिस्टीम मध्ये मिळणाऱ्या संगणक संच, लॅपटॉप, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रिंटर इत्यादी उत्पादनाची व सेवेची माहिती दिली.
एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक धनंजय जेवळीकर यांनी संजय घुले यांच्या संगणक शिक्षण क्षेत्रातील प्रवासाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी आप्पा कापसे व उपसभापती श्रीधर भवर यांनी संस्थेचे तोंड भरून कौतुक करून नवीन आस्थापनेस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी रोटरीचे अध्यक्ष डॉ. अभिजित जाधवर संजय देवगड ,विश्वजीत ठोंबरे ,डॉ अमित पाटील, डॉ सुनील थळकरी, अरविंद शिंदे, सतीश टोणगे, परमेश्वर शिंदे सुनील जाधव संतोष महामुनी विठ्ठल जाधव विकास यादव पंडित दशरथ विश्वजीत ठोंबरे अतुल कवडे रोहन पारख शाम खबाले भागवत चोंदे बाळकृष्ण गुरसाळे लखन गायकवाड रवी सरदार अजय हौसलमल, संजय शेंडगे अनिल जगताप गणेश डोंगरे सतीश मातने बालाजी अडसूळ प्रभाकर आडसुळ सतीश मांडवकर सुंदर कदम यांचे सह अनेकांनी घुले परिवाराला शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर मोरे यांनी तर आभार प्रदर्शन सूर्यकांत काळे यांनी केले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण चव्हाण, गाझी मोमीन शैलेश रणदिवे सचिन थोरात राहुल फाटक अनिकेत वाडेकर हरी ओम भवर यांनी परिश्रम घेतले व सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.



