आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणसांस्कृतिक

शाळा मराठी माझी शाळा मराठी  जि.प.प्रा.शा.शिंदेवाडी शाळेचे  वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

शैक्षणिक विशेष

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

शुक्रवार दि.7/2/2026 रोजी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून केंद्रीय मुख्याध्यापक श्री चोपणे सर व प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच महेश लामतुरे, ग्रामपंचायत सदस्य बालासाहेब निकम, मन्मथ पाटील, संजय लांडगे विजयकुमार राऊत, सिद्धेश्वर डोंगरे, ओमकार लामतुरे तसेच पत्रकार सचिन उजगरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथ जाधव व उपाध्यक्ष स्वाती शिंदे आणि सर्व सदस्य, शिक्षण प्रेमी नागरिक हनुमंत जाधव, राजेश गायके, जयराज निशिगंध, ज्योतीराम शिंदे आणि बालकलेची आवड असणारे शिक्षक मांगडे सर, मोहिते सर, जोशी सर, भोसले सर, बोबडे सर, कल्याणकर सर, आवाड सर, तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, पालक व माता-भगिनी बहुसंख्येने उपस्थित राहिले.

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री कोठावळे सर, करंजकर मॅडम, बांगर सर, काळेबेरे मॅडम, इरगट मॅडम, निशिगंध मॅडम, योगीराज शिंदे आणि सर्व पालकांचे अनमोल असे सहकार्य लाभले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी आपली कला उत्कृष्टरित्या सादर करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे 🙏🏻🙏🏻

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.