आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणपर्यावरण विशेष

बालाजी रूद्राक्ष मित्र परिवाराने राबविले सामाजिक उपक्रम

वृक्षारोपण, १०० गरजू महिलांना साड्या, गोशाळेत चारा व बाकडे वाटप ; मतिमंद अनाथ मुलांना भोजन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

अंबाजोगाई शहर व परिसरात सोमवारी विविध सामाजिक उपक्रम राबवून येथील बालाजी (रूद्र) रूद्राक्ष मित्र परिवाराने आपल्या युवा उद्योजक असलेल्या मित्राचे अभिष्टचिंतन केले.

 

येथील अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या ७/१२ उद्योग समूहाचे प्रमुख बालाजी रूद्राक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समस्त मित्र परिवाराकडून सोमवार, दिनांक ९ जुन रोजी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यात १०० गरजू महिलांना साड्या वाटप करणे, स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयात, अंबाजोगाई येथे अल्पोपहार देणे, आशादत्त गोशाळा येथे गायींना चारा, पेंड, नागरिकांना बसण्यासाठी बाकडे (सिमेंट बेंच) वाटप तसेच ४० रोपांचे वृक्षारोपण ही करण्यात आले. सोबतच राष्ट्रसंत गाडगेबाबा मतिमंद अनाथ मुलांचे वसतीगृह, लातूर येथे अन्नदान करून मित्रांनी ७/१२ उद्योग समूहाचे प्रमुख बालाजी रूद्राक्ष यांचा वाढदिवस साजरा केला. सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवस साजरा करणे म्हणजे काय तर, आपल्या आनंदात इतरांना सामावून घेणे होय. या पद्धतीने, आपण ही इतरांना मदत करून समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो. आपण आपल्या वाढदिवसाला एक अर्थपूर्ण आणि सामाजिकदृष्ट्या सकारात्मक रूप देऊ शकतो. वाढदिवस म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जन्माचा दिवस, हा दिवस सामान्यतः तो व्यक्ती त्याच्या कुटुंबासोबत, मित्र, मैत्रिणींसोबत किंवा इतर जवळच्या नातेवाईकांसोबत साजरा करीत असतो. एकीकडे वाढदिवस म्हटल्यावर पार्टी, पिकनिक अशा कार्यक्रमांना खतपाणी घातले जात असताना, दुसरीकडे मात्र सामाजिक बांधिलकीचे भान जोपासत आपण समाजाचे काही देणे लागतो या जाणिवेतून बालाजी रूद्राक्ष यांच्या सोबत्यांनी आपल्या एका मित्राचा वाढदिवस आगळ्या-वेगळ्या पध्दतीने साजरा करून विधायक कृतीतून समाजापुढे एक आदर्श ठेवला केला आहे. आशादत्त गो-शाळा परिसरात पर्यावरण संवर्धनासाठी ४० रोपांचे वृक्षारोपण ही केले. यामुळे मित्र परिवाराचे सर्वस्तरांतून कौतुक व अभिनंदन होत आहे. सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल ७/१२ उद्योग समूहाचे प्रमुख बालाजी रूद्राक्ष यांनी त्यांच्या मित्र परिवाराचे आभार मानले आहेत. हे विविध उपक्रम राबविण्यासाठी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन करणारे ओंकार घोडके, अजय निकम, वैभव, ओंकार रूद्राक्ष, भंपू रूद्राक्ष, योगेश पोखरकर, स्वरूप घोडके, सोपान, अनिकेत धायगुडे, अमोल धायगुडे, गौरव आकुसकर, धिरज माळी, शुभम पवार, प्रथमेश कणके, राज जोगदंड, प्रेम खैरमोडे, प्रशांत, ओम, अभिराज रेड्डी, अक्षय चव्हाण, आकाश लोदगे, तुषार, सचिन जानकर, कृष्णा नरसिंगे यांच्यासह समस्त मित्रपरिवार उपस्थित होता. यावेळी गोरक्षक उमेशभाऊ पोखरकर यांच्या वतीने आशादत्त गोशाळातील गायींना पेंड, चारा, बाकडे (सिमेंट बेंच) वाटप करून वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी दीपक लामतुरे, कोंडीराम पवार, तिरूपती राठोड, अक्षय धारेकर, आकाश घुले, आदित्य देशमुख, स्वप्नील सोनवणे, कृष्णा नरसिंगे व मित्रपरिवार उपस्थित होता.

 

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.