आपला जिल्हावैभवशाली महाराष्ट्र न्युज

रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई ; चार्टर प्रदान व पदग्रहण समारंभाचे १४ ऑक्टोबर रोजी आयोजन

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

येथील रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई यांच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या चार्टर प्रदान व पदग्रहण समारंभाचे मंगळवार, दिनांक १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता खंदारे मंगल कार्यालय, तथागत चौक, अंबाजोगाई येथे आयोजन करण्यात आले आहे.

 

रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाईचे नवनिर्वाचित अध्यक्ष रो.भिमाशंकर न.शिंदे व सचिव रो.सुनील व्यवहारे तसेच संचालक मंडळाच्या चार्टर प्रदान व पदग्रहण समारंभास प्रमुख अतिथी म्हणून रो.सुधीर लातुरे (प्रांतपाल ३१३२), रो.डॉ.गिरीश कुलकर्णी (उपप्रांतपाल) आणि रो.सुनील जोशी (क्लब एक्स्टेंशन डायरेक्टर) या मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. तसेच यावर्षी गणेश उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या आरास देखावा व विसर्जन मिरवणुक स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण ही याच कार्यक्रमामध्ये करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.