मराठवाडा पदवीधर मतदार नोंदणी मदत केंद्र सुरु करण्यात आले असुन २०२२ पुर्वीच्या सर्व पदवीधारकानी मतदार नाव नोंदणी करुन घ्यावी – गणेश बजगुडे

बीड जिल्हा विशेष
बीड / ५, औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर)पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने मराठवाडा पदवीधर विभागाची मतदार नोंदणी सुरु झालेली असुन दिनांक ०१/ ११/ २०२२ पुर्वी पदवीधर (डिग्री) असलेले किंवा ३ वर्षाची पदविका (डिप्लोमा) असलेल्या मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या सर्व जिल्ह्यातील पदवीधर मतदार बंधु भगिनींनी मतदार नाव नोंदणी करुन घ्यावी. मागील निवडणुकीत नोंदणी केलेली असेल किंवा मतदान देखील केलेले असेल तरी देखील नव्याने नोंदणी करावी लागते यासाठी आपली डिग्री, किंवा डिग्रीचा शेवटच्या वर्षाचा मार्कमेमो, आधारकार्ड, मतदान कार्ड, फोटो आदी कागदपत्रासह पदवीधर मतदार संघासाठी असलेला नाव नोंदणी अर्ज भरुन संबंधित तहसील कार्यालयात जमा करावेत किंवा बीड तालुका काँग्रेस कमिटी व शिवक्रांती युवा परिषदेच्या वतीने सुरु केलेल्या मराठवाडा पदवीधर मतदार नोंदणी मदत केंद्र, बजगुडे निवास, खडकपुरा बीड. संपर्क – 9421281012 याठिकाणी जमा करुन तत्काळ नावनोंदणी करावी असे आवाहन शिवक्रांती युवा परिषदचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटील यांनी केले आहे.



