युवराज भुंबे यांच्या निष्कलंक सेवाकार्याचा सार्थ अभिमान वाटतो – खासदार बजरंगबप्पा सोनवणे
सेवापूर्ती सन्मान सोहळ्यातून युवराज भुंबे यांचा गौरव

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
भारतीय सेनेत हवालदार या पदावर १८ वर्षे आणि बीड जिल्हा पोलिस हवालदार या पदावर १७ वर्षे असे एकूण ३५ वर्षे देशसेवा करून नुकतेच दिनांक ३० सप्टेंबर रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले युवराज नारायण भुंबे यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवार, दि.८ ऑक्टोबर २०२५ रोजी तालुक्यातील डिघोळ अंबा येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार बजरंगबप्पा सोनवणे (बीड लोकसभा) हे तर प्रमुख पाहुणे म्हणून राजकिशोर मोदी (माजी नगराध्यक्ष, न.प.अंबाजोगाई.), सौ.भाग्यश्रीताई बाळासाहेब सोनवणे (सरपंच, डिघोळअंबा), अमरराव देशमुख (तालुकाध्यक्ष, रा.कॉं.शरद पवार पक्ष, अंबाजोगाई), महादेव आदमाने (माजी नगरसेवक, न.प.अंबाजोगाई.), जीवनराव गायकवाड (बीड जिल्हाध्यक्ष, आर.पी.आय – खरात), दीपकभैय्या शिंदे (बीड जिल्हा उपाध्यक्ष, रा.कॉं.शरद पवार पक्ष), धिमंत राष्ट्रपाल (मराठवाडा प्रवक्ता, आर.पी. आय – खरात), अनंतराव अंजान (सरपंच, सनगांव), सुभाष घुंडरे (माजी सरपंच, डिघोळअंबा), बालाजी मुळे (उपसरपंच, डिघोळ अंबा), डिगांबर घुंडरे (चेअरमन, से.सह.सो.डिघोळअंबा), बालासाहेब जोगदंड (मुख्याध्यापक, जि.प.डिघोळ अंबा), बी.एम.खाडे (ग्रामविकास अधिकारी, डिघोळ अंबा), महेश उजगरे (सरपंच, हिवरा) या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते युवराज नारायण भुंबे यांचा सेवापूर्ती निमित्ताने सपत्नीक ह्रद्य सन्मान करण्यात आला. सत्काराचे स्वरूप पुष्पहार, पुष्पगुच्छ व शाल असे होते. सुरूवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तर प्रारंभी अक्षय भुंबे मित्र मंडळाच्या वतीने ही सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना खासदार बजरंगबप्पा सोनवणे (बीड लोकसभा) म्हणाले की, ३५ वर्षे देशसेवा केली आहे. केन्द्र व राज्य प्रशासनात दोन्ही ठिकाणी सेवा करणे हे भाग्य आहे. यामुळे त्यांच्या संपूर्ण निष्कलंक सेवाकार्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो अशा शब्दांत खासदार सोनवणे यांनी युवराज नारायण भुंबे यांचा गौरव केला. तर प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले की, युवराज नारायण भुंबे यांच्या प्रकृतीकडे पाहिले तर असे कोणालाही वाटणार नाही की, ते ३५ वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांना सदृढ, निरोगी दीर्घायुष्य लाभावे अशा सदिच्छा मोदी यांनी यावेळी व्यक्त केल्या. तर यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सोनवणे यांनी ही युवराजजी भुंबे हे आमचे ज्येष्ठ बंधू आहेत. त्यांच्या प्रेरक कार्याविषयी आम्हां डिघोळ अंबा ग्रामस्थांना खूप आदरभाव आहे असे विचार सोनवणे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी अमर देशमुख, महादेव आदमाने, डिगांबर घुंडरे यांनी ही आपले समायोचित विचार व्यक्त करून सेवापूर्ती सन्मान सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सचिन घुंडरे यांनी एका सैनिकाचा शेतकरीपुत्राच्या हस्ते सन्मान करण्यात येत आहे हे अभिनंदनीय आहे असे सांगितले. सुत्रसंचालन शाहिर मामा काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अक्षय भुंबे यांनी मानले. या कार्यक्रमास तुकाराम घुंडरे, नानासाहेब मुळे, शेख रहीम, बाळू भुंबे, रूद्राक्ष सर, सुदाम सोनवणे यांच्यासह नातेवाईक, मित्र परिवार आणि डिघोळ अंबा ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सेवापूर्ती सन्मान सोहळ्याच्या यशस्वितेसाठी अमर भुंबे, अक्षय भुंबे, प्रसाद भुंबे आणि मित्र परिवाराच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.



