ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंबेफळचे ११ विद्यार्थी एलिमेंटरी ड्रॉईंग परीक्षा ए ग्रेडने उत्तीर्ण

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य कला संचालनालय, मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड या परीक्षेमध्ये तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंबेफळ, केंद्र साखर कारखानाचे ११ विद्यार्थी एलिमेंटरी ड्रॉईंग परीक्षेमध्ये ए ग्रेडने उत्तीर्ण झाले आहेत. चित्रकला स्पर्धेत निकालाची उज्ज्वल परंपरा निर्माण करून कुंबेफळचे नांव तालुक्यात उंचावल्याबद्दल कलाशिक्षक राहुल भारत भिसे यांचे मुख्याध्यापक श्रीमती मीना हजारे यांनी विशेष कौतुक केले. व शाळेच्या ए ग्रेडने उत्तीर्ण ११ विद्यार्थ्यांना अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

 

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंबेफळच्या ११ विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड या परीक्षेमध्ये अ श्रेणी मिळाली आहे. या विद्यार्थ्यांसाठी कलाशिक्षक राहुल भारत भिसे यांनी सातत्यपूर्ण परीश्रम घेत सखोल मार्गदर्शन केले. यशस्वी उत्तीर्ण ११ विद्यार्थ्यांना अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. आणि कलाशिक्षक राहुल भिसे यांचा सत्कार करून शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती मीना हजारे यांनी विशेष कौतुक केले. यावेळी शाळेतील श्रीमती एम.पी.डाके, शिक्षक एन.जी.जिरगे, श्रीमती एम.ए.अंबुरे, श्रीमती बी.ए.कांबळे, श्रीमती एम.एम.तोडकर, श्री.एम.एन.गायकवाड, श्रीमती एन.आर.जाधव, श्रीमती अ.दे.तरकसे, श्रीमती राख सी.सी, श्रीमती पिंपरखेडकर, श्रीमती एम.व्ही.मुंडे, श्रीमती वर्षा भोसले, श्री.विनायक जाधव या शिक्षक व शिक्षीका यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंबेफळच्या ११ विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड या परीक्षेमध्ये अ श्रेणी मिळविल्याबद्दल कुंबेफळ ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व सन्माननीय सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य यांनी शाळेचे कलाशिक्षक राहुल भिसे आणि उत्तीर्ण ११ विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. यासंदर्भात माहिती देताना कलाशिक्षक राहुल भिसे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी केलेला सातत्यपूर्ण सराव, पालकांचे सहकार्य, अचूक मार्गदर्शनामुळे उज्ज्वल यश प्राप्त होऊ शकले. सफर रंगांची उपक्रम या द्वारे निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन निसर्गसौंदर्याचा अभ्यास, चित्र रेखाटन, रंगछटांचा अभ्यास केला जातो. विद्यार्थ्यांचा कलात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि विद्यार्थी कलेशी एकरूप व्हावेत, यातून हा उपक्रम सुरू केला. त्याचा फायदा चित्रकला स्पर्धेसाठी झाला. असे कलाशिक्षक भिसे म्हणाले.

 

 

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.