कै.सौ.चंद्रकला सखाहारी गदळे यांचा ५ वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज /प्रतिनिधी
दहिफळ वडमाऊली येथे श्री क्षेत्र वडमाऊली मंदिराशेजारी २५ सप्टेंबर रोजी कै.सौ. चंद्रकला सखाहारी गदळे यांचा य पाचवा पुण्यस्मरण सोहळा शुक्रवार, दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजी अत्यंत श्रद्धापूर्वक वातावरणात आयोजित करण्यात आला होता या निमित्ताने विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन गदळे परिवाराच्या वतीने करण्यात आले होते .या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त शुक्रवार सकाळी दिवंगत चंद्रकला गदळे यांच्या प्रतिमेचे पूजन व सामूहिक भावपूर्ण आदरांजली कार्यक्रम होईल. त्यानंतर परिसरातील नागरिकांसाठी भाषाप्रभू ह.भ.प.श्री.जगन्नाथ महाराज पाटील ( मुंबई)यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या वेळी महाराजांनी आपल्या कीर्तनातून प्रत्येक व्यक्तीने जीवन जगत असताना आपल्या हातून सत्कर्म करत राहिले पाहिजे जेणेकरून आपण या जगाचा निरोप घेतला तरी पाठीमागे आपले कार्यातून आपले नाव राहिले पाहिजे त्यानंतर महाराजांनी मुलगी विषयी सांगितले की घरात असताना भावाची बहीण असते, बहीण असताना संदेशन करा ,भावजईची नणंद असते तेव्हा सामंजस्य धारण करा व पतीची पत्नी झालात तर पतीला सहकार्य करा.तसेच जीवन जगत असताना धर्म,कर्तव्य,काम, मोक्ष या चार गोष्टी ज्याला कळतात व आचरणात आणतो तोच जीवन सुखात जगू शकतो.
त्यानंतर या कार्यक्रमाला श्री. अक्षय भैय्या मुंदडा, श्री.अंकुशराव इंगळे, श्री.विजयकांत मुंडे ,श्री.भगवानराव केदार श्री.रमाकांत मुंडे, श्री.मुरलीबप्पा ढाकणे, श्री शिवाजी पाटील
श्री.डॉ.बालासाहेब कराड,श्री वसंत भाऊ केदार,श्री गाताडे गुरुजी,श्री जालिंदर मोराळे ,श्री. दत्तात्रय (पिंटू)ठोंबरे,श्री नितीन काळे,नामदेव बप्पा गायकवाड शिवाजी जाधव, इत्यादी मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक आणि गदळे परिवाराचे आप्तेष्ट उपस्थित होते. त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दहिफळ वडमाऊली व परिसरातील सर्व नागरिकांनी, स्नेहींनी आणि ग्रामस्थांनी या पुण्यस्मरण सोहळ्यास व महाप्रसादाचा लाभ घेतला शेवटी श्री.सखाहरी गदळे,राहुल (भैय्या ) गदळे, सौ.शालिनीताई कराड,श्री .शशिकांत (अण्णा)दहिफळकर, सौ .श्री.जयदत्त दहिफळकर यांच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.
