आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणसामाजिक

मिराई प्रतिष्ठान तर्फे चंदनसावरगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व स्कॉलरशिप वितरण सोहळा उत्साहात संपन्न

शैक्षणिक उपक्रमाच्या यशस्वी चौथ्या वर्षाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

 

केज प्रतिनिधी

चंदनसावरगाव, दि. १५ ऑगस्ट २०२६:आदर्श शिक्षिका कै. मिरा शिवदास तपसे (शिनगारे) यांच्या स्मरणार्थ मिराई प्रतिष्ठानच्या वतीने लालबहादूर शास्त्री विद्यालय, चंदनसावरगाव येथे इयत्ता १० वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मिराई स्कॉलरशिप -2026 व प्रोत्साहनपर सन्मान वितरण समारंभ सोहळा लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या प्रांगणात 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभदिनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि मिराई स्कॉलरशिप विद्यालयाच्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनींना रोख रक्कम सन्मानचिन्ह, शाल , पुष्पहार , पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात असुन यात

– *प्रथम क्रमांक:* कु. मयुरी उत्रेश्वर तपसे — ९१.८०% — ₹५,००० स्कॉलरशिप

– *द्वितीय क्रमांक:* कु. गौरी नागनाथ पंडीत — ९०.००% — ₹४,००० स्कॉलरशिप

– *तृतीय क्रमांक:* कु. अंजली अंकुश हाके — ८६.२०% आणि कु. किर्ती गणपती देवकर — ८६.२०% — प्रत्येकी ₹३,००० स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांनी दहावी परिक्षेत क्रमांक पटकावल्याबद्दल सन्मानित करण्यात आले तर

 

विशेष प्रावीण्यप्राप्त उत्तीर्ण विद्यार्थ्यांचाही विशेष गुणगौरव करत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत यात पुढील विद्यार्थ्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह , शाल , पुष्पहार देऊन खालील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला यात चि. पवन भारत तपसे, चि. शिवम विलास कल्याणकर, कु. सुष्मिता संभाजी गवळी, कु. स्नेहा अशोक लांब, चि. ओम नानासाहेब तपसे, कु. अक्षरा बाळासाहेब दळवी, कु. नंदिनी बाळासाहेब करपे, कु. अमृता ज्ञानेश्वर गोरे, कु. काजल विलास उमक, चि. अमर सोमनाथ कराड, चि. संकेत रामकिसन तपसे, कु. प्रणिता प्रसाद माने, कु. स्नेहल पांडुरंग काळे, कु. सायली संतोष वाघमारे, कु. ईश्वरी सुशील वाघमारे, चि. गंगाधर बिरुदेव माने, कु. ऋतुजा वाल्मिक माने, चि. पृथ्वीराज रामभाऊ माने यांनी पारितोषिके प्राप्त केली .

सदरील दैदिप्यमान अशा कार्यक्रमास व कौतुक सोहळ्यासाठी गावच्या सरपंच सौ. उषा जालिंदर दळवी आणि उपसरपंच सौ. नीता बाळासाहेब तपसे यांच्या व खालील मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले:

मा. श्री. दिलीप देशमुख सर, मुख्याध्यापक, लालबहादूर शास्त्री विद्यालय

डॉ. कु. तेजस्विनी रमेश तपसे, सरस्वती-धन्वंतरी डेंटल कॉलेज, परभणी

सौ. अर्चना सतीश तपसे, वीरपत्नी, चंदनसावरगाव

सौ. मधुमिता लक्ष्मीकांत तपसे, माजी उपसरपंच, चंदनसावरगाव

सौ. रामकवर परमेश्वर तपसे, माजी ग्रामपंचायत सदस्य, चंदनसावरगाव व जेष्ठ मार्गदर्शक शिक्षणप्रेमी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला असुन हा प्रेरणादायी उपक्रम मा. श्री. महेश शिवदास तपसे, मिराई प्रतिष्ठान / महेश पेट्रोलियम, चंदनसावरगाव यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन श्री. सुंदर खुळे सर यांनी केले.या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकवृंद, युवा मित्र परिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व सर्वांच्या सहकार्याने मिराई प्रतिष्ठान चंदनसावरगाव आयोजित “मिराई स्कॉलरशिप 2026 ” वर्षे ४ थ्या वर्षात शैक्षणिक व सामाजिक उपक्रम यशस्वीपणे उत्साहात संपन्न झाला असुन यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे तसेच लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी , पालक व उपस्थित गावकरी बांधवांचे सहकार्य केल्याबद्दल मिराई प्रतिष्ठानचे प्रमुख मुख्य आयोजक श्री महेश तपसे यांनी आभार मानले.

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.