आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणवैभवशाली महाराष्ट्र न्युज

पोलीस सेवेत निवड झालेल्या माजी विद्यार्थ्याचा सत्कार

शिंदेवाडीच्या जि.प. शाळेत शिष्यवृत्ती गुणवत्ताधारकांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

केज प्रतिनिधी
शिंदेवाडी  | दि. 18 ऑगस्ट 2026

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिंदेवाडी येथे शाळेचा माजी विद्यार्थी अक्षय बन्सी शिंदे याची पोलीस सेवेत निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. याचबरोबर शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षा पात्र तसेच एमटीएस व आरटीएस गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह गुणगौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. नवनाथ जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख श्री. बोराडे सर, पतसंस्थेचे सचिव श्री. संजय गलांडे सर, युसुफवडगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री. महेश लामतुरे उपस्थित होते.

मान्यवरांची उपस्थिती
यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब निकम, अशोक चोपणे, चंद्रकांत भुसारी, ओमकार लामतुरे, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन महादेव मोडवे, शिक्षक बांगर सर, शिक्षणप्रेमी नागरिक ज्योतीराम शिंदे, शहाजी शिंदे, भास्कर शिंदे, जयराज निशिगंध, शा.व्य.स. उपाध्यक्षा सौ. सारिका शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

पालक वर्गातून सुशील शिंदे, सोमनाथ जावळे, अमोल शिंदे, नितीन मोडवे, राहुल शिंदे, सचिन निशिगंध तर माता पालकांमधून स्वाती जाधव, मनीषा शिंदे, वर्षा जावळे, सुकुमार शिंदे, काजल निशिगंध, कविता शिंदे, रिता मोडवे, वनमाला शिंदे, सखुताई शिंदे आणि अंगणवाडी सेविका इरगट मॅडम, रमाताई निशिगंध उपस्थित होत्या.

गुणगौरव झालेल्या विद्यार्थ्यांची नावे
गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कु. आराध्या सोमनाथ जावळे,चि. अरुष नवनाथ जाधव, कु. प्रतिक्षा अमोल शिंदे,चि. सोहम सचिन निशिगंध, चि. शिवम नितीन मोडवे, कु. नंदिनी नितीन मोडवे, कु. राधिका सुशील शिंदे, चि. संगम सुशील शिंदे, चि. दिपक प्रदीप शिंदे, कु. ज्योती प्रदीप शिंदे यांचा विशेष सन्मान करण्यात आला व यावेळी

आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की
पोलीस सेवेत निवड झालेल्या अक्षय बन्सी शिंदे याचा सत्कार करताना मान्यवरांनी सांगितले की, “कष्टाने आणि चिकाटीने कोणतेही ध्येय साध्य करता येते. अक्षय हा सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श आहे.”

केंद्रप्रमुख बोराडे सर म्हणाले, “ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थीही गुणवत्तेत मागे नाहीत हे आज सिद्ध झाले आहे. पालक आणि शिक्षकांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले.”

यावेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे आणि शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक करून शाळेसाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती करंजकर मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. कोठावळे सर यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम आनंदी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.