६१ शिपाई झाले आरोग्यसेवक ; बीड जिल्हा परिषदेच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी मानले मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांचे आभार..!

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
सध्या जिल्हा परिषद बीड प्रशासन होय आज जिल्हा परिषद बीड येथील प्रत्येक चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या तोंडुन फक्त हे एकच वाक्य कानी पडत आहे, ते म्हणजे धन्यवाद.. ! जितीनजी रहमान साहेब धन्यवाद.. ! धन्यवाद.. जिल्हा परिषद प्रशासन बीड. त्याचं कारणही तसंच आहे, दिनांक २७ जुलै रोजी बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने पदोन्नती प्रक्रिया पार पडली, त्यातुन ६१ शिपायांना आरोग्य सेवक पदांवर पदोन्नती देण्यात आली, त्यामुळे बीड जिल्हा परिषदेच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी बीड येथे एकत्रित येऊन सत्कार करून मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, प्रदिप काकडे (उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) जिल्हा परिषद बीड), उल्हास गंडाळ (जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, बीड) यांचे आभार मानले आहेत.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जितीन रहमान हे दिनांक १९ जुन २०२५ रोजी जिल्हा परिषद वर्धा येथून जिल्हा परिषद बीड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रूजू झाले अन् बीड जिल्हा परिषदेच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे नशीबच पालटले, एव्हाना त्यांच्या जीवनमानातच कायापालट झाला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडुन दिनांक ७ मार्च २०२४ रोजी कनिष्ठ सहाय्यक पदांचे सेवा प्रवेश नियमांत बदल करून परिचर वर्ग-४ पदांवरून कनिष्ठ सहाय्यक वर्ग-३ पदांवर पदोन्नतीचे प्रमाण ४०:५०:१० करण्यात आले होते. अधिसूचना निर्गमित होऊन जवळपास सव्वा वर्षे उलटून गेले होते. महाराष्ट्रातील जवळपास तीस जिल्हा परिषदांमध्ये या अधिसुचनेनुसार एकूण २५०० परिचरांना कनिष्ठ सहाय्यक पदांवर पदोन्नतीची संधी मिळाली होती. परंतु, ज्या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी हि अधिसुचना निर्गमित व्हावी यासाठी जिवाचे रान केले होते त्याच जिल्ह्यातील परिचरांना या अधिसुचनेनूसार पदोन्नती मिळत नव्हती. त्यामुळे बीड जिल्हयातील परिचर वर्ग-४ कर्मचारी अतिशय निराशाजनक परिस्थिती मध्ये नौकरी करीत होता. परंतु, दिनांक १९ जुन २०२५ मध्ये जितीन रहमान हे मुख्य कार्यकारी पदावर रूजु झाले अन् केवळ दोनच महिन्यांत सुरूवातील १६ परिचरांना कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नतीची संधी मिळाली, त्यानंतर लगेचच २०२६ नवीन वर्षांच्या पुर्वसंध्येला पुन्हा एकदा ३ वाहनचालक व ३६ परिचरांना पदोन्नतीने तर वाहनचालकांना समायोजनांने कनिष्ठ सहाय्यक पदावर काम करण्याची संधी मिळाली. हि पदोन्नती प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा परिषद बीडचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप काकडे, सहाय्यक प्रशासन अधिकारी सुनिल नवले, कनिष्ठ प्रशासन अधिकारी संतोष गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक श्री सचिन सर, बीडकर सर तसेच पदोन्नती विभागाचे वरिष्ठ सहाय्यक श्रीमती आमले मॅडम व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची आस्थापना सांभाळणारे श्री सावंत सर या सर्व मान्यवरांचे देखील मोलाचे सहकार्य संघटनेला लाभले. अशी प्रतिक्रिया परिचर कर्मचाऱ्यांमधून ऐकावयास मिळत आहे. दरम्यानच्या कालावधीत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटना व राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, मुंबई यांच्या संयुक्त प्रयत्नाने जिल्हा परिषदेकडील परिचर वर्ग-४ कर्मचारी यांना आरोग्यसेवक वर्ग-३ पदावर पदोन्नतीची संधी उपलब्ध झाली. याकामी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय या मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले, भाऊसाहेब पठाण, मुकुंद विनायकराव तुरे यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेकडील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या जीवनांत आनंद निर्माण झाला, दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने आरोग्यसेवक पदाचे सेवा प्रवेश नियम निर्गमित केले. ज्यामध्ये जिल्हा परिषदेतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना एकूण मंजुर पदांच्या २५ टक्के पदे हि पदोन्नती करिता उपलब्ध झाली. त्यानुसार महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा परिषदांमध्ये पदोन्नतीची प्रक्रिया सुरू झाली. मराठवाड्यातील परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, तर उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक, विदर्भातील वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा अशा अनेक जिल्हा परिषदांमध्ये परिचर वर्ग-४ पदांवरून आरोग्यसेवक वर्ग-३ पदांवर पदोन्नतीची प्रक्रिया पार पडत होती. या सर्व घडामोडी मध्ये बीड जिल्ह्यात देखील महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर पवार, जिल्हा सचिव महेश रोकडे व कार्याध्यक्ष आत्माराम गायवळ यांच्या वतीने जितीन रहमान, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना परिचर वर्ग-४ कर्मचाऱ्यामधुन आरोग्यसेवक वर्ग-३ पदावर एकूण पदांच्या २५ टक्के पदांवर पदोन्नती करणे बाबत प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले. या भेटी दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पदोन्नती संदर्भातील तांत्रिक बाबी पुर्ण करुन ४५ दिवसांच्या आत परिचर वर्ग-४ पदावरून आरोग्यसेवक वर्ग-३ पदावर पदोन्नती करण्याबाबतचा शब्द संघटनेला दिला होता अन् तो शब्द केवळ ४० दिवसांतच जितीन रहमान (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड) यांनी पाळला. त्यानुसार दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी परिचर वर्ग-४ कर्मचाऱ्यांमधून आरोग्यसेवक पदांवर पदोन्नती घेऊ इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली तर ज्यांनी आरोग्यसेवक पदांवर पदोन्नती घेण्यास सहमती दर्शविली होती. ज्यांनी आपापली कागदपत्रे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागांकडे तात्काळ जमा केली होती अशा एकुण ९१ कर्मचाऱ्यांची दिनांक ३ जुलै २०२६ रोजी कागदपत्रे पडताळणी करण्यात आली, अन् दिनांक २२ जुलै २०२६ रोजी जितीन रहमान (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड) यांच्या मुख्य उपस्थिती मध्ये अतिशय पारदर्शक पध्दतीने पदोन्नतीसाठी पात्र ठरलेल्या ७० परिचरांचे समुपदेशन घेऊन त्यांना पदस्थापना देण्यात आली, या सर्व प्रक्रियेत एकुण सध्या ६१ परिचरांना आरोग्यसेवक वर्ग-३ पदांवर पदोन्नती मिळाली असुन, आगामी काळात अजुन १२ परिचरांना आरोग्यसेवक पदांवर पदोन्नती मिळणार असल्याची माहिती प्रशासनांकडुन प्राप्त झालेली आहे. बीड जिल्हा परिषदेमधील परिचर वर्ग-४ पदांवरून आरोग्यसेवक वर्ग-३ पदांवरील पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी उल्हास गंडाळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप काकडे, तसेच आरोग्य विभागांतील सहाय्यक प्रशासन अधिकारी दयानंद सरपते, चंद्रशेखर क्षीरसागर तर कनिष्ठ प्रशासन अधिकारी राहुल कांबळे व सामान्य प्रशासन विभागांचे सुनिल नवले, कनिष्ठ प्रशासन अधिकारी संतोष गायकवाड, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांचे स्वीय सहाय्यक श्री सचिन सानप, श्री बीडकर व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची आस्थापना विभागांचे वरिष्ठ सहाय्यक श्री सावंत सर यांनी मागील १५ दिवसांत खूप मोठी मेहनत घेतली, एव्हाना या वरिल सर्व मान्यवरांच्या सहकार्यामुळेच आरोग्यसेवक पदोन्नती प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने व समुदेशनाने पार पाडण्यास मदत झाली अशी भावना संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. जितीन रहमान (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड), प्रदिप काकडे (उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) जिल्हा परिषद बीड), उल्हास गंडाळ (जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद बीड) व मागील एक वर्षांतील सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सर्व मान्यवर अधिकारी कर्मचारी तसेच आरोग्य विभागांतील सर्व सहाय्यक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांच्या सहकार्यामुळेच ऑगस्ट २०२५ ते जुलै २०२६ एकूण वर्षभरातील कार्यकाळात जवळपास एकूण १२५ परिचरांना त्यांच्या हक्कांची पदोन्नती, व एकुण २०० च्या वर केवळ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची कालबध्द पदोन्नतीचे लाभ देऊन त्यांच्या आयुष्यांत आनंद निर्माण करण्याचे काम जितीन रहमान (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड) यांच्यासह बीड जिल्हा परिषद प्रशासनातील सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केल्यामुळे सध्या बीड जिल्हा परिषदेतील प्रत्येक परिचर आणि संघटनेच्या वतीने मान्यवर अधिकाऱ्यांचा सत्कार करून उपस्थितांना पेढे वाटून सर्व संबंधितांचे आभार मानण्यात येत आहेत.



