आपला जिल्हामहाराष्ट्रवैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिकसांस्कृतिक

कोकणातील गरुडेश्वर कला मंच च्या प्रतिष्ठित कलाश्री पुरस्काराने केजचे रोहन वेदपाठक सन्मानीत

केज शहराची मान अभिमानाने उंचावली

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

 

केज/ प्रतिनिधी —

कोकणातील गरुडेश्वर कला मंच यांच्या तर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठित कलाश्री पुरस्कार यावर्षी केज येथील कन्हैय्या ग्रुपचे प्रमुख रोहन वेदपाठक यांना प्रदान करण्यात आला.रोहन वेदपाठक हे कन्हैय्या ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात लोकांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून विविध कार्यक्रमाचे आयोजन केज शहरात व ग्रामिण भागात करत असतात.

गौरी-गणपती सजावट स्पर्धा, नवरात्रोत्सवात दांडिया महोत्सव,दहिहंडी उत्सव,श्रीकृष्ण वेशभूषा,दिव्यांग बांधवासाठी कला प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करतात. यामुळे शहर व ग्रामिण भागातील महिला पुरुष या कला जोपासणाऱ्या उपक्रमांमध्ये मोठया संख्येने सहभागी होतात.त्यांच्या या कला क्षेत्रातील योगदानाची नोंद घेवून कोकणातील गरुडेश्वर कला मंच यांच्या तर्फे रायगड येथे गणेशोत्सवादरम्यान त्यांचा कलाश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे केज शहरातील नागरीकांनी व थोरामोठयांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.त्यांना मिळालेला कलाश्री पुरस्कार त्यांनी सदगुरू श्री. वासुदेव खंदारे गुरुजींच्या चरणी समर्पित केला आहे.

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.