आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनसांस्कृतिक

केजचे भूमिपुत्र अनिल वैरागे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान अमृत महोत्सव गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर

सातत्यपूर्ण सामाजिक कार्याचा विशेष गौरव

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

केज / प्रतिनिधी

केज येथील भूमिपुत्र अनिल लिंबाजी वैरागे यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान अमृत महोत्सव गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आला आहे. आशादीप महिला आधार मंच या सामाजिक संस्थेच्या व ‘लेक लाडकी’ अभियानाच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त तसेच महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
अनिल वैरागे यांनी संगीत क्षेत्रात केलेले निस्वार्थ कार्य, त्यांची सातत्यपूर्ण सेवा व कला जपण्याचा ध्यास यांचा गौरव म्हणून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार सोहळा दिनांक ३ मे २०२६ रोजी मुंबई येथील परळ (पूर्व) येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यास महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक व कवी नंदेश उमाप तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते अनिल वैरागे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
या पुरस्काराची घोषणा होताच केज शहरासह रसिक श्रोते, मित्रपरिवार आणि विविध स्तरातून अनिल वैरागे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.