आपला जिल्हा
फहीमोदीन मोहसिनोद्दीन इनामदार (रा. केज) याने वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी पवित्र रमजान महिन्यात आपला पहिला रोजा केला पूर्ण
समाजबांधवांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज तालुका प्रतिनिधी

पवित्र इस्लाम धर्मातील रमजान हा महिना संयम, त्याग, प्रार्थना आणि आत्मशुद्धीचा संदेश देणारा आहे. अशा लहान वयात रोजा पूर्ण करून फहीमोदीनने श्रद्धा, जिद्द आणि निष्ठेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
रोजा पूर्ण केल्याबद्दल त्यांचा गुलपोशी करून सन्मान करण्यात आला, ही निश्चितच अभिमानास्पद आणि प्रेरणादायी गोष्ट आहे.
ईश्वर त्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि उज्ज्वल भविष्य देवो, हीच सदिच्छा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या आहेत



