रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाईकडून डॉक्टर, सी.ए आणि टॅक्स प्रॅक्टिशनर्स यांचा सत्कार
सेवा हीच आमची ओळख, सेवा हीच आमची प्रेरणा जोपासले ब्रीद

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाईच्या पदाधिकारी व सदस्य यांनी सेवा हीच आमची ओळख, सेवा हीच आमची प्रेरणा हे ब्रीद जोपासत शहर व परिसरात कार्यरत डॉक्टर, सी.ए. आणि टॅक्स प्रॅक्टिशनर्स यांचा सत्कार करून सामाजिक बांधिलकी जोपासत आपले योगदान दिले असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाईचे अध्यक्ष रो.भिमाशंकर न.शिंदे व सचिव रो.सुनील व्यवहारे, प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ.योगेश गालफाडे यांनी दिली आहे.
शहरातील नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमी, अंबाजोगाई येथे रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई यांनी डॉक्टर्स डे व सी.ए. डे साजरा केला. यावेळी अभिनव संकल्पना राबविली. सेवा हीच आमची ओळख, सेवा हीच आमची प्रेरणा हे ब्रीद जोपासत शहर व परिसरात कार्यरत डॉक्टर, सी.ए. आणि टॅक्स प्रॅक्टिशनर्स यांचा सत्कार करून सामाजिक बांधिलकी जोपासली. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ.सिद्धेश्वर बिराजदार हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आए.एम.ए.शाखा अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ.राहूल धाकडे व ऍम्पाच्या अध्यक्ष डॉ.सुलभा पाटील व सी.ए.असोसिएशनचे प्रतिनिधी ऍड.सचिन बजाज तर प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ.योगेश गालफाडे, रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाईचे अध्यक्ष रो.भिमाशंकर न.शिंदे व सचिव रो.सुनील व्यवहारे आणि मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला. या उपक्रमाचे हे पहिले वर्ष होते. प्रारंभी रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई कडून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रम आयोजनामागील भुमिका नमूद करताना रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाईचे अध्यक्ष रो.भिमाशंकर न.शिंदे यांनी सांगितले की, रोटरीच्या माध्यमातून अंबाजोगाई पंचक्रोशीत वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य केले जाईल. समाजाच्या उपयोगी पडेल असे कार्य रोटरीच्या माध्यमातून आम्ही करीत राहू. जिथे कमी तिथे आम्ही ही भावना जोपासून आम्ही कार्य करू व अंबाजोगाईचा सामाजिक वसा व वारसा आम्ही समर्थपणे पुढे घेऊन जाऊत असा विश्वास या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्वांना देतो. यावर्षी प्रथमच आम्ही शहर व परिसरात कार्यरत डॉक्टर, सी.ए. आणि टॅक्स प्रॅक्टिशनर्स बांधव यांचा सत्कार करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी आम्ही रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई प्रयत्नशील राहणार आहोत असे अध्यक्ष रो.शिंदे यांनी सांगितले. तर यावेळी बोलताना प्रमुख अतिथी डॉ.राहूल धाकडे, डॉ.सुलभा पाटील व सी.ए.ऍड.सचिन बजाज या मान्यवरांनी रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाईच्या विविध अभिनव उपक्रमांचे कौतुक केले. तर अध्यक्षीय समारोप करताना डॉ.सिध्देश्वर बिराजदार यांनी पुढील काळात अभिनंदनीय संकल्पना राबवत भीमाशंकर शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई या नव्या क्लबचे कामही अतिशय उत्तम रितीने करतील असा विश्वास व्यक्त करून रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाईला शुभेच्छा दिल्या. सत्काराचे स्वरूप शाल, पुष्पगुच्छ असे होते. प्रारंभी रोटरीचे संस्थापक रो.पॉल हॉरीस यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्ज्वलाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो.जगदीश जाजू यांनी केले. तर सूत्रसंचालन रो.भिमाशंकर शिंदे यांनी करून उपस्थितांचे आभार सचिव रो.सुनील व्यवहारे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला सर्व रोटरीयन रो.डॉ.डी.एच.थोरात, रो.आनंद कर्नावट, रो.पुरूषोत्तम रांदड, रो.जगदीश जाजू, रो.ऍड.प्रवीण बजाज, रो.श्रीकांत धायगुडे, रो.ऍड.कल्याण लोमटे, रो.वि.वा.गंगणे, रो.भागवत कांबळे, रो.वाजेद काझी, रो.कृष्णा चव्हाण, रो.शरद देडे आदींसह अंबाजोगाई शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विधी, वैद्यकीय, पत्रकारिता, संगीत, सहकार, व्यापार आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई यांचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.



