आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणवैभवशाली महाराष्ट्र न्युज

सेल्फ स्टडीच्या बळावर चि. ओंकार रवींद्र साखरे यांची IIT हैदराबाद येथे गरुडझेप

B.Tech इंजिनिअरिंगमध्ये उत्तुंग यश, कॅम्पस प्लेसमेंटद्वारे उत्तम पगाराची नोकरी

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

यशोगाथा विशेष न्यूज

पुण्यात 12वी पर्यंत शिक्षण, सातत्य आणि चिकाटीच्या जोरावर स्पर्धा परीक्षांमध्ये पटकावला प्रथम क्रमांक

पुणे, प्रतिनिधी दि.19 सेल्फ स्टडीच्या बळावर आणि अथक परिश्रमातून यशाचे शिखर गाठण्याचा आदर्श घालून देणाऱ्या चि. ओंकार रविंद्र साखरे यांची IIT हैदराबाद येथील B.Tech इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी निवड झाल्यानंतर तेथे शिक्षण पूर्ण करून त्यांनी कॅम्पस प्लेसमेंटद्वारे उत्तम पगाराची नोकरी देखील मिळवली आहे.

ओंकार यांनी पुणे येथे 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शालेय जीवनापासूनच त्यांची अभ्यासातील चिकाटी आणि सातत्य लक्षवेधी होते. IIT सारख्या देशातील सर्वोच्च तांत्रिक शिक्षण संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी स्वबळावर तयारी केली. अनेक स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्तीर्ण होत त्यांनी विविध ठिकाणी प्रथम क्रमांक पटकावला.

आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी ओंकार यांनी हैदराबाद येथे राहून IIT मधील B.Tech इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. अभ्यासासोबतच कौशल्य विकासावर भर देऊन त्यांनी कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून प्रतिष्ठित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळवली आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मित्रपरिवार, नातेवाईक, सहकारी आणि सर्व शिक्षणप्रेमींकडून हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ओंकारच्या यशाने परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा मिळाली आहे.

“स्वतःवर विश्वास, चिकाटी आणि सातत्य ठेवले तर कोणतेही ध्येय अशक्य नाही” हा संदेश ओंकारच्या यशातून समोर आला आहे.

आई-वडिलांचे स्वप्न साकार करणाऱ्या ओंकारचे
खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा! 💐

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.