आपला जिल्हामहाराष्ट्रवैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिक

उंदरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी 

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष

 

केज :- प्रतिनिधी

 

तालुक्यातील उंदरी येथे शब्दांना संघर्षाची धार आणि साहित्याला समाजपरिवर्तनाची दिशा देणारे महान लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची 106 जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करून जयंती साजरी केली.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, विचार आणि कार्य आजही सामाजिक समता, न्याय आणि मानवतेची प्रेरणा देत असल्याचे मत शिवाजी दादा ठोंबरे यांनी बोलताना व्यक्त केले.

यावेळी छावा मराठा संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी ठोंबरे, उत्तम ठोंबरे गुरुजी,सुदाम दादा ठोंबरे,अनुपम ठोंबरे, दीपक सोनवणे, अर्जुन तात्या जीजाराम ठोंबरे, भीमराव ठोंबरे, दिनेश ठोंबरे,लक्ष्मीकांत ठोंबरे, संतोष लोखंडे,तात्या पंचाळ ,रामभाऊ लोखंडे ,योगा कसबे, बब्रुवान कसबे, सहदेव ठोके, सिताराम ठोके,सुखदेव घोडके, विनोद कसबे, सोनबा ठोंबरे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.