*इरा इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल युसुफ वडगाव येथील विद्यार्थ्यांचे चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
शैक्षणिक विश्व

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज तालुका प्रतिनिधी
केज तालुक्यातील युसुफ वडगाव येथील इरा इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे या परीक्षेत युसुफ वडगाव केंद्रातून इरा इंग्लिश स्कूलचे प्रियल तोडकर, अर्जुन भुमकर, लामतुरे शिवप्रसाद, जोशी सिद्धी, जोशी अमित, टिंगरे आरव, समर्थ सुरवसे पांनढवळे समर्थ, गुजर वरद हे विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत, त्यांच्या या यशामुळे गावासह विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांच्या प्रोत्साहनाच्या बळावर हे यश मिळवले, त्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे संचालक प्राध्यापक बापूसाहेब भुसारी व सर्व शिक्षक वृंद, पालक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या आहेत या यशामुळे विद्यालयाची शैक्षणिक परंपरा बळकट झाली आहे, आगामी काळात अशाच प्रकारे विद्यार्थी गुणवत्तापूर्ण यश संपादन करतील असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला आहे.
तसेच या अगोदरही शैक्षणिक वर्ष 2025- 26 मधील पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत तब्बल 13 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत याचबरोबर शैक्षणिक वर्ष 2025 26 मधील एम टी एस ओलंपियाड परीक्षेतही या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तालुक्यात सर्वात जास्त उत्तीर्ण होण्याचे रेकॉर्ड केले आहे, यामध्ये अर्जुन भुमकर, प्रियाला तोडकर, शांभवी थळकरी तनवी थळकरी आदिती सावंत, शिवप्रसाद रोडगे, स्वरूप भुसारी, सार्थक पवार, कौस्तुभ कोरडे ,आदिती थळकरी यासह 17 मुलांनी गोल्ड मेडल 51 मुलांनी सिल्वर मेडल व इतर विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले.
तसेच इतरही स्पर्धा परीक्षेमध्ये जसे की सैनिकी स्कूल, नवोदय विद्यालय परीक्षे मध्येही विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
या इरा इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल युसुफ वडगाव ने स्पर्धा परीक्षेमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करून विद्यार्थ्यांना भविष्यातील त्यांच्या उज्वल यशासाठी त्यांचा पाया पक्का करून त्यांना घडवण्याचे कार्य केले आहे त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.



