आपला जिल्हासहकार विशेष

अंबाजोगाईत सहकार सप्ताहाचा उत्साहात समारोप; वृक्षारोपणाने दिला पर्यावरण संदेश

केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना दिन व राष्ट्रीय सहकार उत्सव दिनानिमित्त विविध मान्यवरांची उपस्थिती

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

सहकार विशेष

अंबाजोगाई प्रतिनिधी, ७ जुलै

केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापना दिनानिमित्त आणि सहकार सप्ताहाच्या समारोपानिमित्त अंबाजोगाई येथे वृक्षारोपण व राष्ट्रीय सहकार उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, पुणे यांचे सहकार प्रशिक्षण केंद्र, लातूर, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय अंबाजोगाई, कृषी उत्पन्न बाजार समिती अंबाजोगाई आणि राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात पार पडला.

 

वृक्षारोपणाने कार्यक्रमाची सुरुवात

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाली. “सहकारासोबत पर्यावरण संवर्धन” हा संदेश देत उपस्थितांनी परिसरात विविध वृक्षांची लागवड केली.

 

*मान्यवरांची उपस्थिती*

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती, अंबाजोगाईचे सभापती ॲड. राजेश्वर चव्हाण, तहसीलदार विलास तरंगे, सहाय्यक निबंधक जयंत पाठक, सहकार प्रशिक्षण केंद्र लातूरचे उपप्राचार्य एस. आर. कोळ्ळे, बाजार समितीचे संचालक, प्रभारी सचिव बी. जी. अदनाक, सहकार अधिकारी एस. के. चव्हाण, पवार यांच्यासह तालुक्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक व कर्मचारी उपस्थित होते.

 

*सहकारातूनच ग्रामीण विकास शक्य*  

यावेळी बोलताना मान्यवरांनी सहकार चळवळीच्या योगदानावर भर दिला.

 

सहकार प्रशिक्षण केंद्र, लातूरचे उपप्राचार्य एस. आर. कोळ्ळे म्हणाले, _”सहकार हा ग्रामीण विकासाचा कणा आहे. या माध्यमातून शेतकरी, कामगार, ग्राहक व सर्वसामान्यांच्या आर्थिक विकासाला चालना मिळते, हे ओळखून केंद्र सरकारने ६ जुलै २०२१ रोजी स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. सहकारातूनच समृद्धी साध्य होईल.”_

 

सहकाराच्या माध्यमातूनच शेतकरी, महिला आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. सहकार सप्ताहात राबवण्यात आलेल्या जनजागृती उपक्रमांचा आढावा घेऊन यापुढेही अशा उपक्रमांची व्याप्ती वाढवण्यावर भर देण्यात आला.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. आर. कोळ्ळे यांनी केले, तर *आभार प्रदर्शन सहकार अधिकारी एस. के. चव्हाण यांनी मानले.*

 

संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहाच्या वातावरणात पार पडला.

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.