आपला जिल्हासामाजिक

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सेवाभावी संस्थेकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

केज (प्रतिनिधी) : साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सेवाभावी संस्था, नायगाव (ता. केज, जि. बीड) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत नायगाव व धनेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी, तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा समाजापर्यंत पोहोचविण्यासोबतच शिक्षण, समाजसेवा आणि सामाजिक समतेच्या कार्यात संस्था सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय मुजमुले यांनी बोलताना व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय मुजमुले,नायगाव शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब गोरे, मांजरा प्रकल्प धनेगाव शाळेचे मुख्याध्यापक संतोष शेळके,सहशिक्षक कुणाल आयवळे,संस्थेचे उपाध्यक्ष महादेव मुजमुले, यांच्यासह अंगणवाडी शिक्षिका अभिलाषा मुजमुले, वर्षा पोटभरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.