जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आवसगाव (ता. केज, जि. बीड) NMMS परीक्षेत घवघवीत यश!
जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज प्रतिनिधी
National Means-cum-Merit Scholarship (NMMS) परीक्षेत यश संपादन करणाऱ्या आमच्या शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 💐
🎓 यशस्वी विद्यार्थी:
✨ वेदिका सुंदर साखरे
✨ वीरेंद्र राहुल साखरे
✨ समर्थ सयाजी साखरे
✨ सिद्धी संजय सोनवणे
आपल्या सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि परिश्रमामुळे शाळेचा मान उंचावला आहे.
मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थ यांच्यातर्फे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
आवसगाव : येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आवसगाव या शाळेतील चार विद्यार्थ्यांनी National Means-cum-Merit Scholarship (NMMS) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या गुणवत्तापूर्ण परंपरेला मानाचा तुरा रोवला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये वेदिका सुंदर साखरे, वीरेंद्र राहुल साखरे, समर्थ सयाजी साखरे आणि सिद्धी संजय सोनवणे यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. त्यांच्या यशामागे शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
शाळा प्रशासनाने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा अधिक दृढ झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
ग्रामस्थांकडून जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक परिक्षा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेले शिक्षक , शिक्षिका यांचे व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत असून, भविष्यातही अशीच यशाची परंपरा कायम राहो, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



