आपला जिल्हाकृषी विशेषमहाराष्ट्रवैभवशाली महाराष्ट्र न्युजसहकार विशेष

चांगल्या संकल्पनेतून केलेल्या कार्याला नक्की यश मिळते — रजनीताई पाटील

गंगा माऊली साखर कारखान्याचा पहिला हप्ता तीन हजार रुपये देणार - लक्ष्मणराव मोरे

समृद्ध महाराष्ट्राच्या सर्वांगीण बातम्यांसाठी ..

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

(गंगा माऊली शुगरचा पाचवा गळीत हंगाम व सी बी जी प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न)
———————————-

Oplus_131072

केज दि. ११(प्रतिनिधी) गंगामाऊली शुगर च्या पाचव्या गळीत हंगामाला आज सुरुवात करण्यात आली असून या गळीत हंगामाची सुरुवात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मा.खा. रजनीताई पाटील यांच्या हस्ते व चेअरमन लक्ष्मणराव मोरे, ह भ प प्रकाश महाराज बोधले, ह भ प. उद्धव बापू आपेगावकर, किरण पाटील, उद्योगपती राजेंद्र बोडखे , मयूर बोडके,आदित्य पाटील, प्रविण मोरे, राहुल सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना रजनीताई पाटील यांनी अशोकराव पाटील व आपण सुरू केलेल्या कारखान्याची भरभराटी दिवसेंदिवस होत असून हे पाहताना मनोमन आनंद होत असून गंगा माऊली शुगरचे चेअरमन लक्ष्मणराव मोरे यांचे उत्कृष्ट नियोजन लाभल्याने अल्पावधीतच गंगा माऊली कारखाना नावारुपाला आला आहे. आपणही सर्वांनी कारखान्याला सहकार्य करून करावे. कारखाना उभा करण्याची चांगली संकल्पना होती चांगल्या संकल्पनेला यश मिळतेच असे मत रजनीताई पाटील यांनी व्यक्त केले. त्या गंगा माऊली शुगरच्या पाचव्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या.
गंगा माऊली शुगरच्या पाचव्या गळीत हंगामाचा शुभारंभ दत्ता मुळे व त्यांच्या पत्नी या दांपत्याच्या हस्ते पूजा करून करण्यात आला. कारखान्याचे चेअरमन लक्ष्मणराव मोरे यांनी बोलताना सांगितले की, चार वर्षे आपण गाळप यशस्वीपणे पूर्ण केले असून सर्वांचे पेमेंटही वेळेवर दिले आहे. पंधरा दिवसात पेमेंट देण्याचा पायंडा गंगा माऊली शुगरने जिल्ह्यात पाडल्याने शेतकऱ्यांना कारखान्याकडे पैशासाठी चकरा मारण्याची गरज आजपर्यंत भासलेली नाही व यापुढेही तशी वेळ येणार नाही. शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी शेतकरी मेळावे घेतले, लागवडी बाबत मार्गदर्शन केले आणि एवढेच नव्हे आम्ही ए.आय. तंत्रज्ञान वापरून कारखाना परिसरात शेतीचा प्रयोग करत आहोत भावाची चिंता करू नका पहिला हप्ता तीन हजार रुपये दिला जाणार आहे असे मत लक्ष्‍मणराव मोरे यांनी व्यक्त केले. कारखान्याने मागच्या गळीत हंगामात देखील रिकव्हरी चांगल्या पद्धतीने जवळपास 11 ची रिक्व्हरी आपल्या कारखान्याने मिळवली. केवळ दोनच दिवस आपल्या साखरेला जादा भाव मिळाला तर लागलीच आपण महालक्ष्मीचा सणाला तो जादा दर देखील 30 रु. प्रमाणे हप्ता काढून शेतकऱ्यांना दिला. त्यामुळे कारखान्याचा फायदा जेव्हा होईल तेव्हा तो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पोहोच केला जातो हे आपलं कर्तव्य आहे. आपण हा कारखाना केवळ शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून चालवत आहोत दर १४ दिवसाला आपण शेतकऱ्यांना ऊस बील देत आहोत यापुढेही ही पध्दत अशीच कायम राहणार असल्याचे लक्ष्मणराव मोरे यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना कार्यकारी संचालक प्रवीण मोरे यांनी केले त्यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपण कर्मचाऱ्यांना बोनस देत आहोत ही प्रथा यापुढे सुरूच राहील कधीही खंडित होणार नाही असे सांगून कर्मचारी हे आमच्या परिवारातील आहेत त्यामुळे त्यांची काळजी देखील गंगामाऊली ग्रुप घेतो आणि आम्ही ती घेऊ असे त्यांनी सांगितले. तर यावेळी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे यांनी बोलताना सांगितले की, या परिसरातील एक साखर कारखाना उभा रहावा यासाठी खासदार रजनीताई पाटील आणि अशोकराव पाटलांनी अनेक वर्षांपूर्वी स्वप्न बघितले होते ते पूर्ण झाले. आता योग्य माणसांच्या हातात कारखाना दिला असून चेअरमन लक्ष्मण मोरे हे लातूर पॅटर्नचे जनक आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणे हे कारखान्याचे ब्रीदवाक्य असून त्याप्रमाणे मागच्या हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक भाव दिला आहे. यावर्षी ऊस देऊन शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे मत व्यक्त केले.
आदित्य पाटील म्हणाले गंगा माऊली साखर कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध राहील.आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही असे मत व्यक्त केले.
यावेळी ऊस उत्पादनामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या, वाहतुकीमध्ये अतिशय चोख कामगिरी बजावलेल्या तसेच ऊसतोड कामगारांमध्ये ही असाधारण कार्य केलेल्या सर्व घटकांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये
ऊस उत्पादक शेतकरी प्रथम क्रमांक सौ. मंगल दिनकर जाधव,
द्वितीय क्रमांक विलास भैरवनाथ इंगळे, ट्रॅक्टर वाहतुक ठेकेदार प्रथम क्रमांक बाळासाहेब देवीदास राठोड, द्वितीय क्रमांक
माणिक शंकर आडे, ट्रक वाहतुक ठेकेदार प्रथम क्रमांक
रामदास सखाराम आडे,
द्वितीय अहेमद अमीन शेख,
मिनी वाहतुक ठेकेदार प्रथम क्रमांक संजय जयसिंग चव्हाण,
द्वितीय अरूण बाबुराव जाधव,
मिनी वाहतुक ठेकेदार, बैलगाडीवान प्रथम क्रमांक
कैलास दादाराव घुले,
द्वितीय बाळु शिवाजी चाळक
यांचा बक्षीस देऊन व हार शाल देऊन सन्मान करण्यात आला.
सदरील कार्यक्रमासाठी माजी खा रजनीताई पाटील, कारखान्याचे चेअरमन लक्ष्मणराव मोरे, ह भ प प्रकाश महाराज बोधले, ह भ प उद्धवबापू आपेगावकर, भाजपचे चिटणीस किरण पाटील, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदित्य पाटील, काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, राजेश जाधव पाटील, राजेंद्र बोडके, मयूर बोडके, विखे पाटील चे चेअरमन नवनाथ थोटे, संचालक अविनाश मोरे, यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ हनुमंत सौदागर तर आभार अविनाश आदनाक यांनी केले कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

 

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.