आपला जिल्हावैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिक

किल्ले धारूर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नागेश शिनगारे तर सचिव पदी अण्णा गोण्णे

शिवजन्मोत्सव सोहळा 2023

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
धारुर प्रतिनिधी
स्व. नामदेव भाऊ शिनगारे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती किल्ले धारुर ची बैठक सुदर्शन भैय्या शिनगारे व भागवत लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यात सर्वानुमते अध्यक्षपदी नागेश शिनगारे तर सचिवपदी अण्णा गोण्णे यांची निवड करण्यात आली
धारूर शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती चे वर्षे 34 वे ची बैठक तुळजाभवानी मंदिर कसबा विभाग येथे संपन्न झाली गेल्या 34 वर्षापासून स्व.नामदेव भाऊ शिनगारे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुरू केलेल्या शिवजयंती उत्सव 34 वर्षापासून धारूर शहरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यांच्यानंतर गेली तीन वर्ष त्यांचे चिरंजीव सुदर्शन भैय्या शिनगारे हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात याच्याच नियोजनासाठी दि 16 जानेवारी 2023 रोजी तुळजाभवानी मंदिर कसबा विभाग येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यात सर्वानुमते अध्यक्षपदी नागेश शिनगारे, उपाध्यक्षपदी अतुल फुन्ने , सचिव अण्णा गोण्णे, सहसचिव संकेत शिनगारे, कोषाध्यक्ष पदी धनंजय शिनगारे यांची नियुक्ती करण्यात आले. तर मिरवणूक प्रमुख हरिभाऊ मोरे ,विश्वास शिनगारे, चंद्रकांत शिनगारे, निलेश शिनगारे, बालाजी शिनगारे, महेश साखरे,बाळू शिनगारे , पांडुरंग शिनगारे, आकाश शिनगारे,बाळासाहेब शिनगारे,अमरजीत शिनगारे,जीवन पुजदेकर, दत्ता घुमरे,विजय शेळके,संकेत शिनगारे,बालाजी शिनगारे, प्रदीप शिनगारे,सचिन शिनगारे,सोनू धुमाळ, गोविंद पांचाळ, रवी सक्राते, वैभव पुजदेकर ,शकेर भाई ,गणेश बसवर , लखन बारस्कर मनोज बारस्कर ची निवड करण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमीसह नागरिक उपस्थित होते

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.