आपला जिल्हामहाराष्ट्रवैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिक

कु .वर्षा लोकेश काबरा हीचा वाढदिवस नवजीवन संगोपन केंद्र येथील गोरगरीब मुलांना एक दिवसाचे अन्नदान करून साजरा

वाढदिवस विशेष

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज 

 

आष्टी तालुका प्रतिनिधी

आष्टी तालुक्यात नवजीवन फाउंडेशन संचलित नवजीवन संगोपन केंद्र येथे अनाथ,निराधार,ऊसतोड मजूर,वीटभट्टी कामगार,आदिवासी,भटके विमुक्त,गरीब,वंचित,दुर्लक्षित घटकातील मुलांचा मोफत सांभाळ करून शिक्षण दिले जाते.

या नवजीवन संगोपन केंद्रास शासनाचे कोणत्याही प्रकारचे अनुदान किंवा मदत मिळत नाही सदरील केंद्र समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून आणि मदतीतून चालवले जात आहे

या अनाथ,निराधार मुलांना फुल ना फुलाची पाकळी मदत व्हावी तसेच आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्त भावनेने आष्टी येथील महालक्ष्मी स्वीट होम चे मालक लोकेश काबरा यांनी आपल्या मुलीचा 10 वा वाढदिवस अनावश्यक खर्च टाळून नवजीवन संगोपन केंद्र येथील गोरगरीब,अनाथ निराधार मुलांना एक दिवसाचे अन्नदान देऊन सामाजिक उपक्रमाने साजरा केला.त्यांच्या या महान कार्यास या वाढदिवसाच्या निमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा.त्यांच्या हातून अशीच प्रामाणिक सेवा घडो हि प्रार्थना.लोकेश काबरा हे राजस्थान येथून येऊन आष्टी सारख्या ग्रामीण भागात महालक्ष्मी स्वीट होम या दुकानाच्या माध्यमातून व्यवसाय करून आपली वेगळीच ओळख निर्माण करून सर्व सामान्य लोकांची सेवा करतात.सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर राहून सहकार्य करतात.

कार्यक्रमाच्या शेवटी नवजीवन संगोपन केंद्र संस्थापक अध्यक्ष विकास म्हस्के मेजर यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.