काँग्रेस का हाथ किसनो के साथ – गणेश बजगुडे पाटील
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने बीड तालुक्यातील विविध गावात पुरग्रस्ताना मदतीचा हात

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
बीड / मागील काही दिवसांपुर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा अतिशय हवालदिल झाला होता. सणासुदीच्या तोंडावर हातातोंडाला आलेले खरिपाचे पीक निस्तनाबुत झालेले असताना पीक तर गेलेच परंतु जमिनी देखील वाहुन गेलेल्या आहेत. आशा परिस्थितीत मायबाप सरकार मात्र शेतकऱ्यांना मदत नकरता त्यांच्यावर ओढवलेल्या आपत्तीचे राजकारण करण्यात व्यस्त होते. ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये मदतीची मागणी सर्व स्तरावर असताना देखील कुठलीही ठोस मदत तत्काळ शेतकऱ्यांना मिळाली नाही. पंचनाम्याच्या नावावर वेळमारुन नेण्याचे काम या सरकारने केलेले असुन अतिशय तुटपुंज्या मदतीची घोषणा सरकार करत आहे. अशा वेळी काँग्रेस मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन प्रत्यक्ष मदत करत त्यांना आधार देण्याचे काम करत आहे. बीड तालुक्यातील अनेक गावाना माजी मंत्री अशोकराव पाटील, लातुरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटी देत संकटसमयी काँग्रेस पाठीशी असल्याचे सांगितले. फक्त भेटी देवुन न थांबता नुकसानग्रस्त कुटुंबियांना मदतीचा हात देत जीवनावशक वस्तुचे वाटप खासदार रजनीताई पाटील परिवाराच्या वतीने युवा नेते आदित्य पाटील, जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांच्या माध्यमातुन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे पाटील म्हणाले की, काँग्रेस का हाथ किसानो के साथ असुन शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गाच्या पाठीशी काँग्रेस खंबीरपणे उभा आहे. अडचणीत मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे त्याच बरोबर शेतकरी कष्टकरी वर्गाच्या न्याय हक्कासाठी या भारतीय जनता पक्षाच्या जुलमी सरकारच्या विरोधात मोठा लढा देखील उभारणार असल्याचे बजगुडे पाटील यांनी सांगितले यावेळी बलभीम बोरवडे, विनोद पाटील, शेख कादर बाबामिया, श्रीमंत घोडके, भैय्या गोरे, ओंकार नवले आदी पदाधिकारी उपस्थित होते.



