आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रवैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिक

मराठा सेवा संघ शाखा, केज यांच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

केज तालुक्यातील शिक्षणप्रेमी सामाजिक क्षेत्रातील समाज बांधवांनी उपस्थित राहाण्याचे आयोजकांचे आव्हान

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज मिडिया

केज तालुका प्रतिनिधी

मराठा सेवा संघ शाखा, केज यांच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार 2025 हा अत्यंत प्रेरणादायी आणि सामाजिक भान जागवणारा सोहळा रविवार, दि. 7 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता गट शिक्षणाधिकारी कार्यालय, केज येथे उत्साहात आयोजित करण्यात येत आहे. शिक्षकांच्या योगदानाचे मूल्य अधोरेखित करण्यासाठी, तसेच त्यांच्या कार्याचा समाजमान्य गौरव व्हावा या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवश्री सुनिलजी केंद्रे साहेब, गट शिक्षणाधिकारी, केज हे भूषवणार असून शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला विशेष महत्त्व देणार आहे. शिक्षणक्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारे, विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण रुजवणारे, समाजाभिमुख कार्य करणारे तसेच शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श शिक्षकांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

 

कार्यक्रमासाठी शिवश्री डॉ.अशोक थोरात:संचालक, आरोग्य विमा महामंडळ, महाराष्ट्र राज्य

शिवश्री राकेश गिड्डे : तहसीलदार, केज

शिवश्री शैलेश फडसे : मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड नगरपरिषद

शिवश्री जी.बी गदळे : सचिव, जीवन विकास शिक्षण मंडळ, केज

शिवश्री. नागनाथ जाधव जिल्हाध्यक्ष म.से.सं. बीड

शिवश्री. डॉ. भाऊसाहेब चाळक: जिल्हा उपाध्यक्ष म.से.सं. बीड

शिवश्री. दत्तात्रय चाटे :शिक्षण विस्तार अधिकारी, केज

शिवश्री. हनुमंत भोसले :वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते, केज.

शिवश्री. हनुमंत घाडगे : ज्येष्ठ साहित्यिक, केज

शिवश्री. डॉ.हनुमंत सौदागर : प्राचार्य भाऊसाहेब पा.आ.वि केज

शिवश्री. जनार्धन सोनवणे : ज्येष्ठ साहित्यिक, केज

शिवश्री. शिवाजी ठोंबरे : जिल्हाध्यक्ष छावा संघटना, बीड

भाई मोहन गुंड ज्येष्ठ नेते, शेकाप, केज

विनोद शिंदे; जिल्हाध्यक्ष, म.से.सं,समन्वयक, बीड

गोविंद शिनगारे: ज्येष्ठ पत्रकार, केज

राहुल खोडसे :जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, बीड यांसह अनेक निवृत्त प्रधानाध्यापक, शिक्षक आणि अधिकारी यांची प्रतिष्ठित उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाला वैचारिक आणि प्रेरणादायी परिमाण प्राप्त होणार आहे.

 

शिक्षक हा समाजाचा दिशा-दर्शक दीपस्तंभ आहे. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविणे, विचारसंपन्न समाजनिर्मिती करणे आणि राष्ट्राच्या विकासात योगदान देणारे नागरिक तयार करणे ही जबाबदारी शिक्षक पार पाडत असतात. समाजातील या कर्तव्यदक्ष शिक्षकांना सन्मानित करून प्रेरणेचा संदेश देणे, ही काळाची गरज असल्याचे मत कार्यक्रम आयोजकांनी व्यक्त केले.

 

मराठा सेवा संघ, शाखा केज यांनी गेल्या काही वर्षांत विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रमांद्वारे समाजाभिमुख कार्य सिद्ध केले आहे. त्याच परंपरेत आदर्श शिक्षक गौरव सोहळा हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आदर्श शिक्षकांचा गौरव झाल्याने नव्या पिढीत शिक्षणाबद्दल आदर, कर्तृत्व आणि प्रेरणा वाढीस लागेल, असा विश्वास कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मराठा सेवा संघाचे केज तालुका अध्यक्ष शिवश्री जयदिप देशमुख , उपाध्यक्ष शिवश्री युवराज हिरवे , सचिव शिवश्री विष्णू यादव , उपाध्यक्ष शिवश्री किशोर भालेराव यांनी व्यक्त केला असुन सदरील कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे तालुका उपाध्यक्ष शिवश्री अश्विन टोंपे , कोषाध्यक्ष शिवश्री धनराज इंगोले, कार्याध्यक्ष शिवश्री शशिकांत जाधव , संघटक शिवश्री तुषार पाटील , संघटक शिवश्री राहुल देशमुख यांचे सहकार्य लाभणार आहे.

 

सदर कार्यक्रमास शिक्षक, पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा सेवा संघ शाखा, केज यांच्या वतीने करण्यात आले आहे. उपस्थितीमुळे शिक्षकांच्या कामाचा गौरव अधिक अर्थपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी नमूद केले.

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.