आपला जिल्हासामाजिक

ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन, वरद हाईट्स अंबाजोगाई यांच्यावतीने 51 ब्लॅंकेटचे वाटप

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

अंबाजोगाई प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकविकास मंचचे सचिव भूमिपुत्र वाघ, प्रा.भागवत गोरे, शैलेश गुरव, (सहशिक्षक ज्ञान प्रसार विद्यालय मोहा), उत्तरदायित्व एनजीओ फाउंडेशन महाराष्ट्र व ग्राम शक्ती वेल्फेअर फाउंडेशन अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने 51 ब्लॅंकेटचे वाटप अंबाजोगाई बस स्टॅन्ड परिसरात करण्यात आले. सध्या थंडीची लाट वेगाने वाढत आहे. अनेक बेघर लोक – बौद्धिक दिव्यांग असलेल्या व्यक्ती, मर्यादित साधनांसह दररोज प्रवास करणारे, जगण्यासाठी भीक मागणारे लोक, बस स्टॉपवर थरथर कापणारे, सरकारी रुग्णालयात उपचार घेणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्ण आणि झोपडपट्टीत राहणारी कुटुंबे – कडाक्याच्या हिवाळ्याचा सामना करण्यासाठी संघर्ष करत आहेत.

ब्लँकेट वाटण्याचे संस्था कार्य करत आहे. रात्री दहा ते बारा या वेळेत थंडीने गारठलेल्या लोकांना छोटासा उब देण्याचा प्रयत्न संस्था करत आहे. या ब्लॅंकेट वाटप कार्यक्रम प्रसंगी ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन अंबाजोगाई संस्थेचे अध्यक्ष ज्योतीराम सोनके, सचिव प्रा. भागवत गोरे, प्रा. अमित शिंनगारे, प्रा. संतोषजी रोकडे ( पत्रकार न्यूज वन महाराष्ट्र ), वरद हाइट्स सोसायटीचे अध्यक्ष व माहेर स्टील सेंटरचे प्रमुख पाथरकर विद्याधर काका, हनुमान विद्यालय घारगाव चे सहशिक्षक मोहम्मद अब्दुल वाहेद, बापू सरवदे मामा, यांच्या हस्ते गरीब व गरजू व्यक्तींना मोफत ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.

 

 

 

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.