आपला जिल्हा

मराठा सेवा संघ केज यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त सुमंत कदम यांचा सत्कार

सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या केज तालुका उपाध्यक्षपदी निवडीबद्दल करण्यात आले अभिनंदन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

 

केज,  (प्रतिनिधी) :

सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या केज तालुका उपाध्यक्षपदी मा. श्री. सुमंत कदम सर यांची निवड झाल्याबद्दल आज पत्रकार दिनाचे औचित्य साधून मराठा सेवा संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

मराठा सेवा संघाचे केज तालुका अध्यक्ष शिवश्री जयदीप देशमुख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आण्णासाहेब कदम, शिवश्री गोविंद नाना शिंगारे (ज्येष्ठ पत्रकार), बाळासाहेब भोसले (व्यावसायिक), मनोज भोसले, अमजद सय्यद व अभय देशमुख उपस्थित होते.

पत्रकारिता क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करून समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य श्री. सुमंत कदम सर यांनी केले असून त्यांच्या या निवडीमुळे केज तालुक्याचा नावलौकिक वाढल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.