आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

बी.फार्मसी महाविद्यालय, अंबाजोगाई येथे जागतिक महिला दिनाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाचा संदेश

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

======================

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बी.फार्मसी महाविद्यालय, अंबाजोगाई येथे राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस) विभागाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक योगदानाचा गौरव करण्यात आला.

 

श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी आणि कार्यकारी संचालक संकेत मोदी यांच्या संकल्पनेतून आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाचा संदेश देण्यात आला. सदरील कार्यक्रमाची सुरूवात प्रमुख पाहुण्या सौ.संध्या सोळंके (मुख्याध्यापक, घाटनागनाथ प्राथमिक शाळा, अंबाजोगाई, जि.बीड) यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आली. यावेळी प्रा.मंजूषा करेप्पा यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली तसेच उपस्थित मान्यवर, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी ना महिलांच्या योगदानाचा गौरव करत महिला सशक्तीकरणाचा संदेश दिला. त्यानंतर प्रमुख पाहूण्या सौ.संध्या सोळंके यांनी आपल्या प्रेरणादायी मनोगतात सांगितले की, महिला सशक्तीकरण ही केवळ संकल्पना नसून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीची गरज आहे. शिक्षण, आत्मविश्वास आणि समान संधी यांच्या माध्यमातून महिला समाजात नवे आदर्श निर्माण करू शकतात. त्यांनी विद्यार्थ्यांना महिलांचा सन्मान राखत समानतेची भावना जोपासण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संतोष तरके यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात सांगितले की, आजच्या युगात महिला प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाचा आदर करणे आणि त्यांना समान संधी देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना महिलांच्या सन्मानासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी महिला सशक्तीकरणावर आधारित भाषणे, कविता व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रम अधिक प्रेरणादायी बनवला. स्वयंसेवकांनी महिलांच्या कार्य, विचार आणि समाजातील योगदानावर आधारित प्रेरणादायी संदेश सादर केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये महिलांबद्दल आदर, समानता आणि संवेदनशीलतेची भावना अधिक दृढ झाली. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा.मंदार चौधरी यांनी सर्व मान्यवर, प्राध्यापक, कर्मचारीवर्ग व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संतोष तरके यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या उत्कृष्ट व शिस्तबद्ध आयोजनाचे विशेष कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये महिला सशक्तीकरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली तसेच समाजातील महिलांच्या योगदानाची जाणीव अधिक दृढ झाली. कार्यक्रम प्रेरणादायी, ज्ञानवर्धक व मूल्यप्रधान ठरला. यावेळी कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.