आपला जिल्हाराजकीयवैभवशाली महाराष्ट्र न्युज

भाजपा अंबाजोगाई युवक शहराध्यक्षपदी अहेमद पप्पूवाले यांची नियुक्ती

अंबाजोगाई शहरातून पप्पूवाले यांच्या निवडीचे स्वागत

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

केज विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून भारतीय जनता पार्टी अंबाजोगाई युवक शहराध्यक्षपदी अहेमद करीम पप्पूवाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंबाजोगाई शहरातून पप्पूवाले यांच्या निवडीचे स्वागत होत आहे.

 

केज विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून व भारतीय जनता पार्टी अंबाजोगाई शहराध्यक्ष संजय गंभीरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अहेमद करीम पप्पूवाले यांची भारतीय जनता पार्टी अंबाजोगाई युवक शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी अहेमद पप्पुवाले यांनी युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक आघाडीचे शहराध्यक्ष यशस्वीरित्या भुषविले आहे. तर त्यांच्या सुविद्य पत्नी रजिया अहेमद पप्पुवाले या भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चाच्या मंडळ अध्यक्ष आहेत. दोघेही पती-पत्नी एक कुशल संघटक म्हणून ओळखले जातात. अहेमद पप्पुवाले यांना देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात नमूद केले आहे की, आपण आजवर केलेल्या पक्षकार्याची नोंद घेऊन, आपल्या क्षमतेचा वापर पक्षकार्यासाठी पर्यायाने समाज कार्यासाठी अधिक व्हावा या उद्देशाने भारतीय जनता पार्टी, अंबाजोगाई शहर मंडळ कार्यकारिणीत युवक शहराध्यक्ष या पदावर आपली नियुक्ती करण्यात आली आहे, येत्या काळात पदाच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेवून पक्षवाढीसाठी सर्व स्तरावरून प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करून पप्पूवाले यांना त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. आपल्या निवडीबद्दल आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अहेमद पप्पूवाले यांनी सांगितले आहे की, ९ वर्षांपूर्वी म्हणजे २९ नोव्हेंबर २०१६ रोजी मी माझ्या आयुष्यातील पहिल्या नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाला सामोरे गेलो आणि त्यावेळी माझा पराभव झाला होता. त्यावेळेसचा निवडणुकीतला आनुभव घेऊन आणि पराभव स्विकारून भविष्यात सर्वसामान्य नागरिकांकरीता सामाजिक कार्य करण्याचा मनापासून निश्चय केला होता. कारण, त्या वेळेस झालेल्या पराभवापेक्षा मिळालेली मते, त्या जनतेचा मला मिळालेला उत्स्फूर्त पाठिंबा आणि विश्वास यातच मी निवडणुकीच्या पराभवापेक्षा काहीतरी जिंकल्याचा आनंद होत होता. वयाने लहान असल्यामुळे राजकीयदृष्ट्या झालेल्या पराजयाच्या दुःखापेक्षा खुप काही अनुभवयाला आले. खुप काही शिकण्यास ही मिळाले. यातून बोध घेऊन लोकांसाठी कार्य करण्याची ऊर्जा खऱ्या अर्थाने मला या आजच्या ९ वर्षांपूर्वींच्या दिवशीच मिळाली आणि त्या वेळेपासून स्वःताला समाज कार्यासाठी आजपर्यंत वाहून घेऊन घडेल तसे कार्य करण्याचा प्रयत्न करीत आहे. यावेळी आनेक सहकारी मित्रांची मोलाची साथ मदत मला मिळाली. या पुढेही आमच्या नेत्या पर्यावरण मंत्री ना.पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे, कार्यसम्राट आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांच्या नेतृत्त्वाखाली व माझे गुरूवर्य नंदकिशोर (काकाजी) मुंदडा, माझे नेते अक्षय भैय्या मुंदडा, भाजपा शहराध्यक्ष संजय भाऊ गंभीरे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी अंबाजोगाई भाजपा युवक शहराध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल सर्व सन्माननीय मान्यवर नेत्यांचे मनःपूर्वक धन्यवाद व आभार.

 

 

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.