महाराष्ट्रवैभवशाली महाराष्ट्र न्युज

43 व्या मराठी पञकार परीषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनास 19 व 20 नोव्हेंबर ला पिंपरी चिंचवड येथे मोठ्या संख्येने उपस्थीत राहावे राज्य जनसंपर्कप्रमूख – अनिल महाजन

पुणे पिंपरी-चिंचवड(प्रतिनीधी) मराठी पत्रकार परिषदेचे 43 वे राष्ट्रीय अधिवेशन पिंपरी चिंचवड पुणे येथे 19 व 20 नोव्हेंबर रोजी संपन्न होत असून या अधिवेशनात विविध कार्यक्रमाचे आयोजन दोन दिवस करण्यात आले आहे. विविध मान्यवरांची उपस्थिती या अधिवेशनास लाभणार आहे. राज्यातील पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने या अधिवेशनात उपस्थित राहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे राज्य जनसंपर्कप्रमुख अनिल महाजन यांनी केले आहे
पत्रकारांची मात्तृसंस्था असणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेचे 43 वे राष्ट्रीय अधिवेशन पिंपरी चिंचवड पुणे येथे 19 व 20 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले असून या दोन दिवशीय अधिवेशनाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे परिषदेचे मुख्य विश्वस्त व पत्रकारांचे नेते मा. श्री. एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली व परिषदेचे विश्वस्त किरण नाईक व अध्यक्ष शरद पाबळे यांच्या नियोजना मध्ये या अधिवेशनाची तयारी पिंपरी चिंचवड पत्रकार संघ करत असून. या अधिवेशनात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. दोन दिवस विविध विषयावर चर्चासत्र व वेगवेगळे कार्यक्रम ही आयोजित करण्यात आले आहेत. अनेक मान्यवरा बरोबर मान्यवर पत्रकारांचीही उपस्थिती या अधिवेशनात लाभणार असून पत्रकारांची एकजूट व पत्रकारा पुढील समस्या यावर प्राधान्याने या अधिवेशनात चर्चा होणार आहे. तरी या अधिवेशनास राज्यातील पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व हे अधिवेशन यशस्वी करावे. या अधिवेशनास येणाऱ्या पत्रकार बांधवां साठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा लवकरच करण्यात येणार असून याची लिंक ही सर्वत्र टाकली जाणार आहे. तरी राज्यातील सर्व पत्रकारांनी आपली नोंदणी करावी व आपली निवास व भोजन व्यवस्था ही या अधिवेशन संयोजकाच्या वतीने करण्यात येणार आहे. तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे अधिवेशन यशस्वी करावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे राज्य जनसंपर्कप्रमुख अनिल महाजन यांनी केले आहे

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.