आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनसामाजिकसांस्कृतिक

इरा इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे.

सांस्कृतिक कार्यक्रम विशेष

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

बीड जिल्हा /प्रतिनिधी:- केज तालुक्यातील युसूफवडगांव येथील इरा इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात साजरे करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती वैद्यकीय अधिकारी डॉ केवश सारूक,श्री.नागरगोजे साहेब गटविकास अधिकारी केज,प्राचार्य हनुमंत सौदागर,उमाकांत भुसारी,डॉ.शिवाजी मस्के,श्री.राजाभाऊ खरबड,तर प्रमुख उपस्थिती म्हणुन सरपंच श्री.सुरेश नांदे,सरपंच,श्री.युवराज ढोबळे,सरपंच श्री.अंगद इंगळे,सरपंच श्री.विश्वास शिनगारे,सरपंच श्री.रूस्तूम चौधरी,श्री.राजाभाऊ यादव,श्री.अरूण राऊत संचालक कृ.उ.बा.स.केज युवानेते किरण सातपुते,उपसरपंच,श्री.गणेश नांदे,सरपंच श्री.प्रविण पवार तसेच ग्रा.पं.सदस्य श्री.आशोक चोपणे,श्री.काशीनाथ खरबड,प्रविण वैरागे,श्री.दादा निकम,श्री.विजयकुमार राऊत,श्री.सिद्धेश्वर डोंगरे हे उपस्थिती होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी गणेश वंदना करून कार्यक्रमाची सुरुवात केले.यानंतर चिमुकल्यांनी ‘देवा मला शाळेत जायचं हाय’ व ‘मेरा वाला डान्स’ All is well ओम शांती ओम ‘हवा हवा ए हवा,चिंताता चिता,न सांगताच आज हे कळे मला’चाकर शिवबाच होणार”गाडी घुंगराची’बायकोने उपवास केला अशा उपहासात्मक गाण्यावर नृत्य सादर केले तर काही विद्यार्थ्यांनी ‘बुर्गुंडा होईल’ हे भारूड सादर करून लोककलेतून समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक बापुसाहेब भुसारी,विकास जाधव,महादेव सौंदणे,रमेश सौंदणे,लक्ष्मण दोडके,शिवराज स्वामी,शिवदास खरबड,ओम खरबड,पंकज माने,रत्नलिंग लोखंडे,संदिप जोशी,आनिल निकम,बाळासाहेब सपकाळ सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.तर कार्यक्रमाचे सुत्ररसंचाल सौ.अंजली तानगे यांनी केले.

Share

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.