श्रीराम नवमी यात्रेसाठी मौजे आवसगाव नगरी सज्ज
महाराष्ट्रासह पंचक्रोशीतील हजारो श्रीराम भक्तांची राहणार उपस्थिती
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
अखंड हरिनाम सप्ताह्याचा शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न.
वैभवशाली महाराष्ट्र प्रतिनिधी
केज तालुक्यातील मौजे आवसगाव नगरी येथे श्रीराम नवमी 2026 निमित्त भव्य आणि आकर्षक स्वरूपात सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन मंदिर परिसर रोषणाईने उजळून निघाला आहे. यावर्षीचा भगवान श्रीराम जन्मोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण, पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.

या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राम जन्म सोहळा, अभिषेक, आरती, भजन-कीर्तन , पारायण व प्रवचनांचा समावेश असणार आहे.
तसेच अखंड हरिनाम सप्ताहा निमित्त महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तनकार ह.भ.प. महाराज यांच्या कीर्तन सेवेचे व श्री राम कथेचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे. या कीर्तन सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात रंगून जाणार असून भाविकांना आध्यात्मिक समाधानाचा लाभ होणार आहे.
मंदिर परिसर आकर्षक सजावटीने उजळून निघाले असून भाविकांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. श्री राम जन्माचा मुख्य सोहळा गुरुवार दिनांक 26 मार्च 2026 रोजी ठिक दुपारी १२ वाजता श्रीराम मंदिर परिसर मौजे आवसगाव येथे हजारो श्री राम भक्तांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यावेळी पालखी सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रसाद वितरण होणार आहे.
प्रतिवर्षिप्रमाणे याही वर्षी विशेष आकर्षण म्हणून भाविकांसाठी चिंचेचे पन्हे व पुरीची मेजवानी असणार आहे. या अनोख्या प्रसादामुळे सोहळ्याची रंगत अधिकच वाढणार असून भाविकांना एक वेगळा अनुभव मिळणार आहे.
गावातील सर्व नागरिक, युवक मंडळे व महिला मंडळे मोठ्या उत्साहाने सहभागी होत असून संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी या पवित्र सोहळ्यास उपस्थित राहून भगवान श्रीराम यांचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
– आयोजक,
श्रीराम नवमी उत्सव समिती, मौजे आवसगाव



